शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

निरपराधाच्या मारहाणीवर एसपींकडून बदलीचा उपचार

By admin | Updated: September 4, 2015 00:51 IST

चंद्रपुरातील रोहीत बोथरा या व्यापारी युवकाला पोलिसांनी दारू विक्रेता समजून ३१ आॅगस्टच्या रात्री अमानुष मारहाण केली.

गुन्हे दाखल करण्याची मागणी : पोलिसांच्या भूमिकेवर व्यापाऱ्यांचा रोष चंद्रपूर : चंद्रपुरातील रोहीत बोथरा या व्यापारी युवकाला पोलिसांनी दारू विक्रेता समजून ३१ आॅगस्टच्या रात्री अमानुष मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांची भूमिका पूर्णत: चुकीची असल्याने संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची जनभावना आहे. मात्र त्याऐवजी पोलिसांच्या बदल्या करून चौकशी अहवाल आल्यावर कारवाई करण्याची भूमिका जिल्हा पोलीस अधिक्षकांनी घेतली आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर व्यापारी वर्गात तीव्र रोष व्यक्त होत आहे.याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांना बुधवारी व्यापाऱ्यांच्या निषेध मोर्चाचे शिष्टमंडळ भेटले असता, व्यापारी युवकाला मारहाण करणाऱ्या एलसीबी पथकातील पाच पोलिसांच्या बदल्या करून या प्रकरणाच्या चौकशीची धुरा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्यावर सोपविली. येत्या पाच दिवसांत गिरी यांना चौकशी अहवाल मागितला आहे. मात्र त्यांच्या या कारवाईवर व्यापाऱ्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे रोष कायमच आहे.चंद्रपूर येथील व्यापारी युवक रोहीत बोथरा ३१ आॅगस्टच्या रात्री चिमूर येथून वसुलीचे काम आटोपून इंडिका कारने चंद्रपूरकडे येत होता. यादरम्यान, घोडपेठ येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विनानंबर प्लेटच्या एका टाटासुमोने रोहीतच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. वसुलीतील मोठी रक्कम जवळ असल्याने रोहीत चांगलाच घाबरला. पाठलाग करत असलेल्या टाटा सुमोचा वेग पाहून रोहीतनेही आपल्या वाहनाचा वेग वाढविला. मात्र टाटासुमोद्वारे पाठलाग सुरूच होता. कुणी तरी लुटारूच आपला पाठलाग करीत असल्याची शंका बळावल्याने रोहीतने आपल्या ताब्यातील वाहन वेगाने वरोरा नाका चौकातून पुढे वाहतूक कार्यालयापर्यंत नेऊन थांबविले. येथे उपस्थित असलेल्या पोलिसांमुळे रोहीतला धिर आला. मात्र काही कळायच्या आत मागून येणाऱ्या टाटासुमोतील लोकांनी खाली उतरून रोहीतला वाहनाच्या बाहेर फरफटत काढले आणि अतिशय निर्दयपणे मारहाण सुरू केली. या कर्मचाऱ्यांचा हा उन्माद सामान्यांच्या अंगावर काटा आणणारा होता. ते पोलीस कर्मचारीच असल्याची बाब काही वेळानंतर उघड झाली. यांपैकी एकाच्याही अंगावर पोलिसाचा गणवेश नव्हता. रोहीतला रस्त्यावर तर मारहाण करण्यात आली. त्यानंतर वाहतूक शाखेतील रुममध्ये नेऊन तेथेही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीने रोहीत अर्धमेला झाला. यावेळी या पोलिसांनी त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला होता. त्यामुळे त्याला घडलेला प्रकार घरीदेखील कळविता आला नव्हता. एलसीबी पथकाने घटनेच्या रात्रीच रामनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून ३०७ कलम (जीवे मारण्याचा प्रयत्न करणे) लावली. त्यानंतर रात्री उशिरा त्याच्या कुटुंबियांशी मोबाईलवरून संपर्क झाला. ही बाब माहीत झ्याल्यावर रोहीतचे नातेवाईक आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी ठाण्यात पोहोचले. चुकीचे कलम लावून निरपराधाला गुन्हेगार ठरविले जात असल्याची बाब या मंडळींनी मांडल्यावर रात्री दोन वाजताच्या दरम्यान जुना एफआयआर रद्द करून २७९ कलम (बेजबाबदारपणे वाहन चालविणे) लावली, असा त्याच्या नातेवाईकांचा आरोप आहे. पोलिसांना मारहाण करण्याचा अधिकार आहे काय ?कायद्याचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. हे करताना एखाद्याचा संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली जाते. तो कोण आहे, कुठून आला, अशी विचारणा केल्यानंतर जर तो संशयीत गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावर गुन्ह्याचे स्वरूप पाहून कायदेशिर कारवाई व अटक करावी असा नियम आहे. कायदाही तेच सांगतो. एखाद्या गुन्हेगाराला अटक केल्यानंतरही पोलीस याच नियमाने कारवाई करतात. मात्र रोहीतच्या प्रकरणात पोलिसांनी चक्क कायदाच धाब्यावर बसविल्याचे दिसून आले.मारहाणीची चौकशी सुरू- एसपीरोहीत बोथरा या युवकाला मारहाण का केली, या संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांना विचारणा केली असता ते म्हणाले, त्याचीच चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पाच पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत. पाच दिवसात अहवाल आल्यावर या प्रश्नांची उत्तरे मिळतील.हात दाखवूनही न थांबल्याची चीडअंगावर पोलीस गणवेश नाही, वाहनाला क्रमांक अथवा त्या वाहनावर ‘पोलीस’ असे कुठेही लिहून नसल्याने पोलिसांनी वाहनाला हात दाखवूनही रोहीतने वाहन थांबविले नाही. यामागे त्याच्या मनातील भीती होती. असे असताना कोणतीही विचारपूस न करता पोलिसांनी रोहीतला फुटेस्तोवर बदडून काढले. पोलिसांची ही कोणती कार्यप्रणाली आहे, असा सवाल सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी हात दाखविला. मात्र रोहीत थांबला नाही. यामुळे ‘अहं’ दुखावलेल्या या पोलिसांनी रोहीतला मारहाण केली, असा त्याच्या कुटुंबियांचा आरोप आहे. रोहीत पुन्हा रुग्णालयातपोलिसांनी बेमुर्वतपणे अर्धमेला होईस्तोवर रोहीतला मारहाण केली. पायातील बुट आणि कमरेचा पट्टा याचा मारहाण करण्यासाठी वापर करण्यात आला. मी व्यापारी आहे, वसुलीवरून परत येत होतो, असे ओरडून-ओरडून सांगणाऱ्या रोहीतचे काहीही ऐकून घेण्यात आले नाही. तू दारू तस्करी करीत आहे, असा बनाव करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत रोहतच्या शरीरावर ठिकठिकाणी जबर दुखापत झाली आहे. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. परंतु त्याची प्रकृती गंभीर बनल्याने गुरूवारी सायंकाळी त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत रोहीतच्या कानाचा पडदा फाटला आहे. त्यामुळे शुक्रवारी त्याच्या कानाचे आॅपरेशनही करावे लागणार आहे.