शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:03 IST

महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने जिवती येथे जिल्हास्तरीय महिला लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने जिवती येथे जिल्हास्तरीय महिला लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद चंद्रपूरचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार अ‍ॅङ संजय धोटे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, बांधकाम व अर्थ सभापती संतोष तंगडपल्लीवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यावेळी उपस्थित होते.यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, आदर्श जिल्हा निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महिला लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून ग्रामविकासाची कामे करावी. जिवती तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर तालुका ज्ञान संपन्न झाला पाहिजे. यासाठी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या सर्व सोईनिशी उत्तम दर्जाच्या तयार करा. शाळांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून संस्कारयुक्त शिक्षण तालुक्यातील बालगोपाळांना द्या. गरिबी अभ्यासाच्या आड येता कामा नये.जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी ग्रामविकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची सांगळ गरजेची आहे. ज्या क्षेत्रात महिला काम करतात त्या क्षेत्रात नक्कीच यश प्राप्त होते, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी केले. संचालन बाबा कोडापे तर आभार सुनिल जाधव यांनी मानले.