शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

साडेसातशे उमेदवारांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:25 IST

सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देऊन रोजगार निर्माण करणे अथवा नोकरी मिळवण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मोहीम सुरू आहे.

ठळक मुद्देकौशल्य विभागाचा उपक्रम : स्वयंरोजगाराची मिळाली दिशा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देऊन रोजगार निर्माण करणे अथवा नोकरी मिळवण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान मागील तीन वर्षांतजिल्ह्यातील १ हजार ७३६ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे यातील ११७ युवकांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे.उमेदवारांना प्रशिक्षित करणे, विविध ठिकाणच्या खासगी व्यवस्थापनाशी संपर्क साधणे, विविध प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणार्थी मिळविण्यासाठी मदत करणे, प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देणाºया संस्थेवर नियंत्रण ठेवणे, रोजगार मेळाव्याचे आयोजन करणे, असे विविध कार्य या विभागामार्फत जिल्ह्यात सुरु असतात. कौशल्ययुक्त चंद्रपूर जिल्हा बनविण्याकडे या विभागाचा कटाक्ष असून आदिवासी अनुसूचित जमाती याशिवाय अन्य घटकांतील उमेदवारांना प्रशिक्षण, नोकरी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे पतपुरवठा करण्याचे कार्य या विभागामार्फत केल्या जात आहे. युवकांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम प्रशिक्षण देऊन शहरी व गावपातळीवर रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्रपणे कौशल्य विकास विभाग स्थापन केला आहे. याचे दृष्यपरिणाम आता दिसू लागले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ६४२ युवक, युवती रोजगार स्वयंरोजगारक्षम झाले आहेत. या प्रशिक्षणामुळे युवकांच्या जीवनात रोजगार व स्वयंरोजगारातून आर्थिक सुबत्ता आली आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानअंतर्गत जिल्ह्यात ४२ तुकड्यामध्ये १ हजार १२९ युवक युवती प्रशिक्षण घेत असून १३ तुकड्यांमधील ३७२ युवक युवतींचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच शहरी गरीबीचे प्रमाण कमी करणे, शहरातील बिकट आर्थिक परिस्थितीतील कुटुंबांना कौशल्य विकासातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी देऊन त्यांचे किमान जीवनमान उंचावण्याकरिता राष्टÑीय शहरी उपजिविका अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १७ तुकड्यामध्ये ५०७ उमेदवार प्रशिक्षणाचा लाभ घेत असून ९ तुकड्यांमधील २७० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.मिळविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाचा लाभ घेवून असंख्य युवक, युवती आपले जीवन समृद्ध करीत आहे. ज्यात बांधकाम, फॅशन डिझाइन, गारमेंट आणि कृषी क्षेत्रातील विविध विषयांचा समावेश आहे.ग्रामविकास प्रवर्तकपदाची संधीग्रामीण भागातील उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार प्रदान करता यावा, म्हणून शासनाकडून ग्रामीण भागात ग्रामविकास प्रवर्तकाची नेमणूक करण्यात आली आहे. मूल व जिवती तालुक्यातील आजूबाजूच्या ग्रामपातळीवरील एकूण ६० युवक- युवती दोन्ही योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत. प्रमोद महाजन कौशल्य विकास एनयूएलएम व आरडीएफ या तिन्ही योजनेंतर्गत ५९ तुकड्यांमधून १ हजार ७३६ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. जवळपास २२ तुकड्यांमधील ६४२ उमेदवारांचे प्रशिक्षण झाले. यातून रोजगारक्षम होण्याची संधी मिळाली. कौशल्यानुसार नोकरी मिळू शकते. ११७ युवक-युवती निरनिराळ्या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगारक्षम झाल आहेत. या योजनेअंतर्गत बाजारपेठेत उच्च मागणी असलेल्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. युवक- युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षणातून सक्षम व्हावे आणि अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रातून रोजगार मिळविण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरले आहे.