शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

रेल्वे मार्ग पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By admin | Updated: June 23, 2014 23:47 IST

चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर नागभीड- नागपूर ही ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि वडसा गडचिरोली हा नवीन रेल्वे मार्ग होणे गरजेचे आहे आणि हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्याशिवाय

अशोक नेते : रेल्वे बजेटपूर्वी घेणार रेल्वेमंत्र्यांची भेटनागभीड : चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर नागभीड- नागपूर ही ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि वडसा गडचिरोली हा नवीन रेल्वे मार्ग होणे गरजेचे आहे आणि हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही चिमूर- गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.या दोन्ही मार्गाच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी खासदार नेते यांनी नागपूर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची नागभीड येथे बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नागभीड- नागपूर या ब्रॉडगेज मार्गासाठी खासदार हंसराज अहीर, आमदार अतुल देशकर, आमदार सुधीर पारवे यांनी तर वडसा- गडचिरोली मार्गासाठी आमदार असताना सतत पाठपुरावा केला आणि मंजुरी मिळवून घेतली. पण मधल्या पाच वर्षात काँग्रेसच्या आमदार- खासदारांनी या दिशेने काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे या मार्गाला गती मिळाली नाही. पण आता असे होणार नाही. या मार्गाला गती मिळावी यासाठी आपण नुकतीच रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली असून या मार्गाचे महत्व त्यांना पटवून देण्यात आले असून त्यांनीही या मार्गासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. खासदार नेते यांनी सांगितले की, ९ जुलै रेल्वे बजेट आहे. त्या अगोदरच ७ तारखेला आ. अतुल देशकर, आमदार सुधीर पारवे यांचे सोबत घेवून केंद्रातील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी यांचे माध्यमातून आणखी रेल्वे मंत्र्यांशी भेट घेणार आहेत. आणि या दोन्ही मार्गाचा प्रश्न लावून धरणारा आहोत. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्या-त्या भागातील विविध समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने रेल्वे प्लाटफार्मची उंची वाढविणे, रेल्वेचे बोगदे तयार केले आहेत. त्यात सुधारणा करणे, आरक्षणाचा वेळ वाढविणे आदी विविध समस्यांचा यात समावेश होता. यावेळी ब्रह्मपुरीत आमदार अतुल देशकर, उमरेडचे आमदार सुधीर पारवे, वसंत वारजुकर, संजय गजपुरे, गजानन पाथोडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)