शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भंगारात निघालेली रेल्वेगाडी नागभीड-नागपूर मार्गावर

By admin | Updated: March 3, 2016 01:14 IST

मध्य भारतात नॅरोगेज रेल्वे लाईन बंद करून त्याचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रॉडगेज मार्गाची मागणी दुर्लक्षित : रेल्वे प्रवाश्यांच्या समस्यांकडे दुर्लक्षघनश्याम नवघडे नागभीड मध्य भारतात नॅरोगेज रेल्वे लाईन बंद करून त्याचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या लाईनवरील भंगारात निघालेल्या गाड्यांपैकी एक गाडी नागभीड-नागपूर या नॅरोगेज रेल्वे लाईनवर चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १ मार्चपासून ही गाडी सुरूही करण्यात आली आहे.मध्य भारतात ज्या काही नॅरोगेज रेल्वे लाईन होत्या, त्या सर्व नॅरोगेज रेल्वे लाईन बंद करून त्याचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. अनेक मार्गावरील ब्रॉडगेजच्या कामाला सुरूवातही करण्यात आली आहे. अपवाद फक्त नागभीड-नागपूर या नॅरोगेज रेल्वे लाईन ठरली आहे. मध्य भारतातील अनेक मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होत असल्याने त्या मार्गावरील अनेक मिटरगेज गाड्या निकामी झाल्या. अनेक कर्मचारीही बेकार झाले. निकामी झालेल्या गाड्या उभ्या ठेवायच्या कुठे, असा प्रश्न रेल्वे प्रशासनासमोर निर्माण झाला. त्यातूनच त्यातील एक गाडी नागभीड-नागपूर या मिटरगेज मार्गावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.विश्वसनीय माहितीनुसार मध्य भारतात रेल्वेचे जे काही नॅरोगेज रेल्वे मार्ग होते ते आता पुर्णत: बंद झाले असून केवळ १०० कि.मी. अंतराचा नागभीड-नागपूर हाच मार्ग नॅरोगेज म्हणून उरला आहे. या मार्गाशी पुर्व विदर्भातील चार खासदारांचे लोकसभा सलग्न आहेत. असे असले तरी या मार्गाला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आली आहे. काँग्रेस राजवटीत या मार्गाला रेल्वे बजेटमध्ये स्थान मिळाले होते. पण पुरेशा पाठपुराव्याअभावी निधी मिळू शकला नाही. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या रेल्वे अंदाजपत्रकात या मार्गासाठी २५ कोटीचा निधी उपलब्ध होणार असल्याची चर्चा आहे, पण ठोस पुरावा कोणीच देत नाही.त्यातच १ मार्चपासून या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्यात आली आहे. या मार्गाचे काम सुरू होणार होते तर नवीन गाडी सुरू करण्याचा उपद्व्याप कशाला करण्यात आला असता, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.राज्य शासनाने या मार्गासाठी पुढाकार घेऊन ब्रॉडगेजचे काम सुरू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.