शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करीची वाहने पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:21 IST

अवैधरित्या रेतीचे खनन करून तस्करी करणाऱ्या दहा वाहनांना कोरपन्याचे तहसीलदार हरीश गाडे व पथकाने पकडले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

ठळक मुद्देपोलिसांचे सहकार्य : तहसीलदारांची धडक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : अवैधरित्या रेतीचे खनन करून तस्करी करणाऱ्या दहा वाहनांना कोरपन्याचे तहसीलदार हरीश गाडे व पथकाने पकडले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.तहसीलदारांच्या या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. पकडलेल्या दहा वाहनातील नऊ वाहनात रेती तर एका वाहनात गिट्टी भरून असल्याचे आढळून आले. यातील तीन वाहने कोरपना तर सात वाहने नारंडाजवळ पकडण्यात आली. सध्या कोरपन्याचे तहसीलदार हरीश गाडे यांनी अवैध गौण खनिज खननाविरुध्द धडम मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत बुधवारी कोरपना, नारंडा परिसरात गस्त सुरू असताना सदर वाहने पकडण्यात आली. यात कोरपना पोलिसांचेही सहकार्य घेण्यात आले. सदर कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी कमलवार, मडावी यांनी केली. रेती तस्करीतील वाहने कोरपना तहसील कार्यालयापुढे जप्त करून ठेवण्यात आली आहे. अशा कारवायामुळे अवैध रेती तस्करीवर आळा बसत आहे.महसुलात वाढतहसीलदार हरीश गाडे यांनी वर्षभरात केलेल्या धडक मोहिमेमुळे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या एक वर्षाच्या कालावधीत कोरपना तहसील कार्यालयाच्या महसुलात विक्रमी वाढ झाली आहे. वर्षभरात ५९ विविध प्रकरणामधे तब्बल १७ लाख ५३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तहसीलदार गाडे हे रुजू झाल्यापासून कोरपना तहसील कार्यालयाच्या कामकाजातही मोठी गतिमानता प्राप्त झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनखाली विविध गावात महसूल विभागातर्फे शिबिर लावून प्रमाण पत्रे वितरित करण्यात आली. त्यामुळे नागरिकातही समाधानाचे वातावरण आहे.