शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

पूल दबल्याने वाहतूक बंद

By admin | Updated: April 6, 2015 01:19 IST

मूल तालुका मुख्यालयाशी जोडणाऱ्या भेजगावजवळील उमा नदीवरील पूल दबल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला

बससेवा बंद : नागरिक, विद्यार्थ्यांना त्रास; बांधकाम विभागाचे दुर्लक्षभेजगाव : मूल तालुका मुख्यालयाशी जोडणाऱ्या भेजगावजवळील उमा नदीवरील पूल दबल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. परिणामी या मार्गावरील परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.पुलाला मधोमध भेगा जाऊन पूल दबला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. भेजगाव व हळदी या दोन गावांच्या सीमेवरून वाहणाऱ्या उमा नदीवर जवळपास ३० वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली राहत असल्याने मोठमोठे भगदाड पडले आहेत. दरवर्षी बांधकाम विभागाकडून पुलाची डागडुगी करून रस्ता मोकळा करून दिला जाते. मात्र यावेळी भर उन्हाळ्यात पूल दबला असून जि.प. बंधकाम विभागाने पूल दुरूस्तीच्या कोणत्याही हालचाली न केल्याने नागरिकांत रोष पसरला आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीतच पूल दबल्याने वाहतूक बंद झाली. याचा त्रास महाविद्यालयीन युवक-युवतींना सोसावा लागत आहे.मूल हे तालुक्याचे ठिकाण असल्याने भेजगाव परिसरातील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता मूल येथे जातात. मात्र पूल दबल्याने बसफेऱ्या बंद आहेत. पुलावरून वाहतूक करताना केव्हाही मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चार-पाच किमी पायदळ जाऊन समोर आॅटोनी प्रवास करावा लागत आहे. यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.भेजगाव परिसरातील १५ गावांना या पूलाने तालुक्याला जोडले आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. मात्र लोकप्रतिनिधींची पोकळ आश्वासने व प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणाचे ग्रहण या पुलाला लागल्याने या रस्त्यावरील वाहतूक आता बंद पडली आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून पूलाची उंची वाढविण्याची मागणी आहे. मात्र या पुलाची उंची वाढलेली नाही.बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या पुलाची दुरूस्ती तत्काळ करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)