चिंधीचक : उन्हाळा म्हटलं की लग्न सराई आणि वाहतूक पोलिसांसाठी अनुकूल कालावधी. या काळात ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा फुरसतीचा हंगाम असते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना व मजूर लोकांना सवड असते आणि याच कारणाने शेतकरी व ग्रामीण भागातील मजूर आपल्या मुला-मुलीचे लग्न उरकून टाकण्याच्या बेतात असतात. पण याहीपेक्षा सुगीचे दिवस वाहतूक पोलिसांना आले आहे. त्यामुळेच वाहतूक पोलीस या दिवसात वर्दळीचे ठिकाण सोडून निर्जनस्थळी कर्तव्य बजावताना दिसतात.वाहतून पोलिसाची नियुक्ती वर्दळ स्थळावर वाहतूक व्यवस्था चोख राहावी, वाहतुकीवर नियंत्रण राहावे, कोणीही वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करू नये, या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक वर्दळीच्या चौकात होत असते.परंतु लग्नसराईमध्ये सदर वाहतूक पोलीस अगदी विपरीत स्थळी तैनात होत असतात आणि वरात घेऊन आलेले ट्रक, ट्रॅक्सी, सुमो आदी चारचाकी वाहनांवर चालानच्या नावावर हजारो रुपये उकळले जातात. प्रत्यक्षात चालानसुद्धा फाडल्या जात नाही. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत भर नाही तर वाहतूक पोलिसाच्या खिशात भर पडत आहे. (वार्ताहर)
वाहतूक पोलीस वर्दळ सोडून निर्जनस्थळी
By admin | Updated: May 12, 2016 01:10 IST