शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

‘ती’ मंडळे आजही जोपासताहेत परंपरा !

By admin | Updated: September 24, 2015 01:16 IST

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना काही मंडळांकडून आजही मंडळाच्या जुन्या परंपरा जोपासल्या जात आहेत.

चंद्रपूर : सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना काही मंडळांकडून आजही मंडळाच्या जुन्या परंपरा जोपासल्या जात आहेत. काही मंडळे आपल्या वैशिष्टयपूर्ण उपक्रमामुळे आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.चंद्रपूर येथील गोलबाजारातील एका चाळीत साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाला १०८ वर्षांची परंपरा आहे. ३१ आॅगस्ट १९०८ मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्याही आधीपासून येथे सार्वजनिक स्वरुपात श्रीची स्थापना केली जाते. लोकमान्य टिळकांच्या विचाराने प्रेरित होऊन बालगुंडजी पंडित यांनी १९०८ मध्ये सर्वप्रथम येथे श्रींची स्थापना केली होती. या ठिकाणी टेलरिंगची दुकाने आहेत. या दुकानांच्या चाळीतच गणरायाची स्थापना होते. या गणेशोत्सवासाठी तब्बल १० दिवस ही दुकाने स्वमर्जीने दुकानदार बंद ठेवतात. ही परंपरा आजही जोपासली जात आहे. भजन आणि भोजन हे जणू या मंडळाचे ब्रिदच आहे. दहाही दिवस रात्री या ठिकाणी भजन केले जाते. दिवसभर काबडकष्ट केलेले गोलबाजारातील दुकानदार रात्री भजनात सहभागी होतात. विशेष म्हणजे, या मंडळाने एक्का (अखंड टाळ) ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. यासोबत गणरायाचे विसर्जनही अतिशय साधे म्हणजे भजन-कीर्तन गातच केले जाते. ढोलताशे, बॅण्ड संदल या वाद्यांना मंडळाने दूर ठेवले आहे. वर्षभरात कुणाचे निधन झाले असेल तर मंडळाच्या दर्शनी भागातच त्यांचे श्रध्दांजली फलक लावले जाते. विशाल आक्केवार मंडळाचे सध्या अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष प्रभाकर आक्केवार तर सचिव गोटू दिकोंडवार आहेत.ताडाळी येथील गोपानी आयरन अ‍ॅण्ड पॉवर (ईं) प्रा.ली या कंपनीच्या वसाहतीतही गणरायाची स्थापना होते. कंपनीतील बरेच कामगार व अधिकारी येथे राहतात. कामाला श्रध्देची जोड देऊन दरवर्षी कामगार व अधिकाऱ्यांतर्फे हा उत्सव साजरा होतो. गणेशाच्या मूर्तीजवळ एक दानपेटी ठेवण्यात येते. दरवर्षी गणेश भक्तांच्या देणगीतून जमा झालेली रक्कम सामाजिक जाणीवेतून जवळच्या अनाथाश्रमात तसेच गोशाळेला देणगीच्या रूपात देण्यात येते. मंडळाने ही परंपरा आजही जोपासली आहे.चंद्रपूरचा राजा जटपुरा गणेशोत्सव मंडळ आपल्या वेगळ्या वैशिष्टयामुळे जिल्ह्यात प्रसिध्द आहे. दरवर्षी डेकोरेशन करताना देशातील विविध प्रसिध्द वास्तूंचे देखावे तयार केले जाते. यंदा मंडळाने फत्तेपूर सिखरीच्या बुलंद दरवाजासह गाभाऱ्यात राजवाड्याची अत्यंत सुंदर व मनमोहक सजावट करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)