संजय गांधी महाविद्यालय पेल्लोरा १०० टक्के : यादवराव धोटे महाविद्यालय ९५ टक्के राजुरा : मंगळवारी घोषित झालेल्या बारावीच्या निकालात राजुरा तालुक्याने निकालाची परंपरा कायम ठेवत उत्कृष्ठ निकाल दिला आहे. यामध्ये इन्फन्ट जिजस पब्लिक स्कूलचा विद्यार्थी प्रतिक उपाध्याय ८६.१५ टक्के गुण घेवून राजुरा तालुक्यातून प्रथम आली आहे. तर द्वितीय वैष्णवी ठाकरे ८६ टक्के आणि शिवाणी बिल्लोर ८५.८४ टक्के गुण पटकावून तृतीय आली आहे. शिवाजी महाविद्यालयातून शिवाणी पिल्लारे ८५.८४ टक्के गुण घेवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय साक्षी राजुलवार ८३.०७ टक्के, तृतीय सोहल टेभुर्णे ८१.५४ टक्के मिळवीले आहेत.येथील शिवाजी महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ८४.४३ टक्के, विज्ञान शाखेचा ९७ टक्के, वाणिज्य शाखेचा ८९.३६ टक्के, एमसीव्हीसी शाखेचा ७९.२४ टक्के एमसीव्हीसी मधील अकाऊन्टींग अँड मार्केटिंग ९१.३० टक्के, काप सायन्स ८५.७१ टक्के, हार्टीकल्चर ६४.२९ टक्के, शिवाजी महाविद्यालयचा निकाल ८९.८६ टक्के, इन्फन्ट जिजस इंग्लिश पब्लिक स्कूल राजुराचा ९३.८७ टक्के, यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयाचा ९४.९४ टक्के, या महाविद्यालयातून प्रथम सौरभ राऊत ८०.९२ टक्के मिळवीले. जिल्हा परिषद महाविद्यालय ९२.६९ टक्के, संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय पेल्लोरा १०० टक्के, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय ७४ टक्के, जिल्हा परिषद आश्रम शाळा देवाडा ९१ टक्के, शिवाजी आश्रम शाळा सुबई ९२.७४ टक्के, महर्षी उत्तम स्वामी महाराज महाविद्यालय चिचोली ९६ टक्के घोषित झाला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी आमदार सुभाष धोटे, नगराधञयक्ष अरुण धोटे यांनी केले.
राजुरा तालुक्यात उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 01:44 IST