शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेडिंग कंपनी देत आहे फसवणुकीचे धडे

By admin | Updated: August 13, 2015 01:54 IST

राजुरा शहर घोटाळ्याचे शहर म्हणून उदयास येत आहे. शेअर मार्केट घोटाळा, भिसी घोटाळा, आरडी घोटाळ्यानंतर आता राजुऱ्याच्या सुशिक्षित बेरोजगार ...

राजुरा : राजुरा शहर घोटाळ्याचे शहर म्हणून उदयास येत आहे. शेअर मार्केट घोटाळा, भिसी घोटाळा, आरडी घोटाळ्यानंतर आता राजुऱ्याच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना फसविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.राजुरा शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवक सुरज कुकडे आणि विक्की मडावी हे महाविद्यालयीन युवक आहे. नागपूरच्या एका ट्रेडिंग कंपनीमध्ये या मुलांना बोलाविण्यात आले. त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी १५ हजार रुपये घेण्यात आले. वाचून न दाखविता १०-१२ फोटो लावून २०- २५ स्वाक्षऱ्या व अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. अत्यंत गुप्त ठिकाणी नेऊन लोकांना कसे फसवायचे हे धडे या ठिकाणी दिले जात असल्याची धक्कादायक माहिती असून पैसे घेतल्यानंतर पगार पाहिजे असल्यास चार नवीन व्यक्तींना बोलावून आणणे गरजेचे आहे, असे सांगितले जाते. चार व्यक्तीमागे १ हजार ६०० रुपये कमिशन दिले जाते. चार मुले नाही आणली तर पगार दिला जात नाही. या ट्रेडिंग कंपनीत लोकांची फसवणूक कशी करायची, या संबंधित धडे शिकविण्यात येत असल्याचे काही सुरक्षित बेरोजगार युवकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. या दोघांचेही वडील मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. नोकरी लागणार म्हणून १५ हजार रुपये वडिलांनी दिले. परंतु नागपूरच्या कंपनीनी आमची फसवणूक केली. या ठिकाणी इतर राज्यातील दोनशेच्या वर सुशिक्षित बेरोजगार युवक कार्यरत असून अनेकांची फसवणूक होत असल्याचेही त्यांनी सांगितले.