शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाघ शोधण्यासाठी वनाधिकाऱ्यांचा ट्रॅक्टरने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:09 IST

येथील वर्धा नदीच्या काठावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी तसेच वाघाच्या शोधासाठी भद्रावती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर लगेच घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र घटनेच्या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना अंदाजे दीड किलोमीटर चक्क ट्रॅक्टरने प्रवास करावा लागला.

ठळक मुद्देरस्ते चिखलमय : वाघाने केल्या तीन शेळ्या ठार

रत्नाकर ठोंबरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपिपरी देशमुख : येथील वर्धा नदीच्या काठावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी तसेच वाघाच्या शोधासाठी भद्रावती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर लगेच घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र घटनेच्या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना अंदाजे दीड किलोमीटर चक्क ट्रॅक्टरने प्रवास करावा लागला.पिपरी देशमुख येथे वर्धा नदीच्या काठावर नेहमीप्रमाणे शेळ्या चरत असताना कळपावर वाघाने हल्ला चढविला. यात शेळ्या चारत असलेला इसम सुदैवाने बचावला. मात्र वाघाच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या. काही क्षणातच घटनेची वार्ता वाºयासारखी पसरली. पिपरी देशमुख येथील पोलीस पाटील सुनिता ठोंबरे यांनी वनविभागाला भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्राधिकारी स्वाती महेशकर व वनविभागाची चमू घटनेचा पंचनामा करण्यासाठी तसेच वाघाच्या शोधासाठी घटनास्थळी दाखल झालेनुकताच पाऊस पडून गेल्यामुळे घटनास्थळापर्यंत जाणारा पांदण रस्ताही चिखलाने माखला होता. घटनास्थळ हे नदीकाठी असल्यामुळे तिथे जाण्यासाठी ट्रॅक्टरशिवाय पर्याय नव्हता. गावातील संदीप नांदे यांनी यावेळी आपले ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. वाघाच्या शोधासाठी वनपरिक्षेत्राधिकारी व चमूला झाडाझुडूपातून रस्ता काढून दीड किलोमीटरचा खडतर प्रवास ट्रॅक्टरने करावा लागला. यावेळी गावातील पंढरी खुटेमाटे, तंमुस अध्यक्ष भाऊराव खुटेमाटे व गावातील काही नागरिकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर घटनास्थळापर्यंतचा प्रवास केला. दरम्यान, ट्रॅक्टरचा प्रवास हा आपल्या आयुष्यातील पहिलाच प्रवास असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी स्वाती महेशकर यांनी सांगितले.