शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बुरूज ढासळण्यापूर्वीच सावरा रे...

By admin | Updated: March 6, 2017 00:29 IST

या शहराचे ऐतिहासिक वैभव म्हणून परकोट आणि चार प्रवेशद्वारांची गणना होते. या ऐतिहासिक वैभवाची ठिकठिकाणी पडसूड सुरू झाली आहे.

‘इको-प्रो’चे अभियान : ऐतिहासिक वारशाची जपणूकचंद्रपूर : या शहराचे ऐतिहासिक वैभव म्हणून परकोट आणि चार प्रवेशद्वारांची गणना होते. या ऐतिहासिक वैभवाची ठिकठिकाणी पडसूड सुरू झाली आहे. परकोटावर झाडे आणि झुडूपे उगवली असल्याने त्यांच्या मुळांच्या आकारामुळे परकोटाला तडे गेले आहेत. तसेच बुरूजाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यासंदर्भात ईको-प्रो या संस्थेने पुरातत्व विभागाला सहभागी करून घेत १ मार्चपासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.चंद्रपूर शहरात ऐतिहासिक किल्ला, मंदिर, मूर्त्या, समाध्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्याकडे लक्ष दिले न गेल्याने त्यावर झाडे-झुडपे वाढली आहेत. सभोवती जमा झालेला कचरा, पुरपाण्यामुळे ढासळणारे चिऱ्यामुळे ऐतिहासिक वास्तुचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. या वास्तु तुटलेल्या अनेक भागात अतिक्रमणसुद्धा वाढलेले आहेत. पुरातत्व विभागावर अवलंबून न राहता १ मार्चपासून किल्ला व परकोट स्वच्छता अभियान इको-प्रो संस्थेने सुरूवात केले असून पहिल्या टप्प्यात पठाणपुरागेट परिसरात स्वच्छता केली जात आहे. किल्लाच्या भिंतीवरील वाढलेली झाडे, वेलींमुळे किल्ल्यास तडे जात आहेत. या किल्लास भेगा, भगदाड पडलेले असून भिंती मोडकळीस येत आहे. या अभियानात इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे, नितीन रामटेके, बिमल शहा, राजू काहीलकर, सुमित कोहळे, धमेंद्र लुनावत, रवींद्र गुरनुले, विकील शेंडे, महेश होकणे, हरिदास कोराम, विशाल रामेडवार, संजय सब्बनवार, सचिन धोतरे, अमोल उट्टलवार, रोशन धोतरे, सौरभ शेटये, शंकर पोईनकर, आशिष भोयर, सागर मस्के, वैभव मडावी, निखिल खांडगोरे, नरेंद्र नोकरकर आदी श्रमदान करीत आहेत. चंद्रपूरचा इतिहास जिवंत ठेवणे, ऐतिहासिक वास्तुंचे जतन करणे, इतरांमध्ये या वास्तुंविषयी आस्था निर्माण करणे आदी प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. इको-प्रो चे ‘चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान’ हे एका संस्थेचे नसून सर्व चंद्रपूरकरांनी सहभागी व्हावे व सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)परकोटावर चढून सफाईपरकोटाची भिंत चंद्रपूर शहराच्या सभोवताल सात किलोमीटर लांबीची बांधण्यात आलेली आहे. परकोट दगडांनी सरळ उभा बांधण्यात आला आहे. त्यावर चढून झाडे तोडणे कठिण आहे. त्यामुळे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी गिर्यारोहकाप्रमाणे दोर बांधून झाडे तोडणे सुरू केले आहे. शिवाय झुडपे तोडण्यासाठी विशेष शिडी (निशानी) बनविली आहे. इको-प्रोचे स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे चंद्रपूरच्या पुरातत्वीय ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढे आले आहेत.पुरातत्त्व विभागाकडून फेरउभारणीपरकोटाची पडझड सुरू असल्याने पुरातत्त्व विभागाने काही भागात फेरउभारणी सुरू केली आहे. पठाणपुरा भागात परकोटाची नवीन दगडांची भिंत उभारली जात आहे. ५० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. परंतु ते काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. कोरण्यासाठी दगड पडलेले आहेत. भिंतीच्या बांधकामासाठी आणलेला चुन्याची पोती झाकून ठेवण्यात आली आहेत.