शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टोर्इंगची दबंगगिरी

By admin | Updated: January 7, 2015 22:49 IST

दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या चंद्रपूर बसस्थानावरील सुरक्षेचा प्र्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अनेक प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबीयांना आपले वाहन

वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे साईनाथ कुचनकार - चंद्रपूरदररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या चंद्रपूर बसस्थानावरील सुरक्षेचा प्र्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अनेक प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबीयांना आपले वाहन रस्त्याच्या कडेला पार्क करावे लागते. रस्त्यावरील वाहनाच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशावेळी वाहन धारक आपले वाहन बसस्थानकातील मोकळ्या जागेमध्ये ठेवतो. मात्र टोर्इंगवरील कर्मचारी येऊन वाहन उचलून नेतात. अनेकवेळा मानसिक त्रास होतो. याला जबाबदार बसस्थानक व्यवस्थापक की, वाहतूक पोलीस हा प्रश्न कायम आहे. बसस्थानकासह शहरातील इतर परिसरात किमान वाहनतळ उभे करून द्यावे, त्यानंतर चूक झाल्यास खुशाल वाहन उचलून न्यावे, अशा प्रतिक्रिया आता सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.दिवसेंदिवस चंद्रपूर शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत वाहनतळ नसल्याने हा प्रश्न गंभीर होत आहे. कोणतीही व्यवस्था नसताही वाहतूक विभागाकडून वाहनधारकांना अक्षरश: वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी ‘नो पार्किंग’ असे फलक लावून बसस्थानक प्रशासन मोकळे झाले आहे. मात्र येणारे प्रवाशी आणि त्यांना आणून सोडणारे नागरिक आपले वाहन कुठे ठेवणार याचा कुठेही विचार केला नाही.बसस्थानकाच्या अगदी समोर असलेल्या रस्त्यावर वाहन पार्क करावे, असे उत्तर दिले जाते. मात्र येथेही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने वाहनधारकांची चांगलीच पंचायत होत आहे. अशावेळी बहुतांश वाहनधारक बसस्थानाच्या आतील बाजूमध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर वाहन पार्क करतात. मात्र वाहतूक विभागाचे कर्मचारी येथे येऊन वाहन घेऊन जातात. हा नित्यक्रम मागील वर्षभरापासून सुरु आहे. दररोज नवे वाहन धारक येतात. विशेष म्हणजे, वाहतूक विभागातील टोर्इंग वाहनावरील कर्मचारी बसस्थानक परिसरात असलेले वाहन उचलून कारवाई करतात. केवळ पाच ते सात मिनिटासाठी दोनशे ते तिनशे रुपयांचा आर्थिक भुर्दंड तथा मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रथम वाहनतळ उपलब्ध करून द्या, नंतर कारवाई करा, असे प्रवाशी तसेच नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र याकडे बसस्थानक प्रशासन तथा वाहतूक पोलीस ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. केवळ कारवाई करून आपली जबाबदारी पार पाडणारे वाहतूक पोलिसातील टोर्इंगमधील कर्मचारी प्रवाशांची अक्षरश: अरेरावी करतात. नियमाला बगल देत वाहतूक पोलिसात काम करत असल्याचा आव आणून प्रवाशी तथा वाहनधारकांना वाट्टेल ते बोलतात. मात्र या कर्मचाऱ्यांना गप्प ठेवण्याचे साधे औचित्य वाहतूक पोलीस दाखवित नाही. मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरु आहे.टोर्इंग वाहन घेऊन यायचे आणि दुचाकी उचलून न्यायच्या या प्रकारामुळे वाहनधारक बेजार झाले आहे.