शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराच्या नव्या संधी देणार पोंभुर्णातील टुथपिक केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:04 IST

राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅण्ड आर्ट युनिट उभारण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री करणार बांबू हॅन्डीक्राफ्ट युनिटचे शुक्रवारी लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅण्ड आर्ट युनिट उभारण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या वतीने सदर टूथपिक उत्पादन केंद्रासाठी टाटा ट्रस्टने सामाजिक दायित्वाअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला बआहे. पोंभुर्णा येथे बांबू हॅन्डीक्रॉफ्ट अ‍ॅण्ड आर्ट युनिटच्या माध्यमातून परिसरातील युवक व महिलांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे टूथपिक उत्पादन केंद्राच्या माध्यमातून या भागात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. चिचपल्ली येथील केंद्रातूनही बांबूवर आधारित आधुनिक प्रशिक्षणाचे दालन सुरू झाले. अर्थ व वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते टूथपिक उत्पादन केंद्र व बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅण्ड आर्ट युनिटचे लोकार्पण होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, माजी नगर पंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार, नगर पंचायत अध्यक्ष श्वेता बनकर उपस्थित राहणार आहेत.वायफाय सुविधापोंभुर्णा येथील बसस्थानकाच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच वायफाय सुविधेचे लोकार्पणही होणार आहे. प्रवाशांना सर्व मूलभूत सोईसुविधा देण्यासाठी विविध योजना सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.