शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

आजची रात्र वैऱ्याची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:47 IST

मागील नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या मनपा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता शांत झाली.

छुप्या प्रचारात उमेदवार व्यस्त : भरारी पथकाची करडी नजरचंद्रपूर : मागील नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या मनपा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता शांत झाली. शहरात चौफेर फिरणारी प्रचाराची तोफ थंडावल्याने आता छुप्या प्रचाराचा जोर वाढला आहे. अधिकृतरित्या प्रचाराला पायबंद घातल्यानंतरही उमेदवार व त्यांचे समर्थक प्रभाग फेऱ्यातच व्यस्त आहेत. १९ एप्रिलला मतदान असल्याने १८ एप्रिलची रात्र वैऱ्याची समजली जात असून उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा व पोलीस प्रशासनही प्रभागाकडे करडी नजर ठेवून आहे.मनपा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतरच काही उमेदवारांनी प्रचार सुरू केला होता. मात्र उमेदवारांना चिन्ह वाटप केल्यानंतर म्हणजेच ९ एप्रिलपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात झाली. यंदाच्या निवडणुकीत प्रभागाच्या सीमा वाढविण्यात आल्याने सतत नऊ दिवस रात्रंदिवस उमेदवार प्रचारात व्यस्त झाले. प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची मोठी दमछाक झाली. तरीही समर्थकांच्या बळावर उमेदवारांनी हे दिव्य पार पाडले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज सोमवारी सायंकाळी ६.३० वाजतापासून प्रचाराला पायबंद घालण्यात आला आहे. त्यामुळे मागील नऊ दिवसांपासून शहरात सुरू असलेला किलबिलाट अखरे थांबला. उघडपणे प्रचार थांबला असला तरी पुढचा एक दिवस अत्यंत महत्त्वाला असल्याने प्रत्येक उमेदवार छुप्या प्रचाराला लागले आहे. आजपर्यंत गाठीभेटी घेऊन मतदारांना आपलेसे केल्यानंतर विरोधी उमेदवार मतदारांना आमिषे देऊन उगाच समिकरण बिघडवू नये म्हणून डोळ्यात तेल घालून प्रत्येकजण आपल्या मतदारांकडे लक्ष ठेवून आहे. मंगळवारची रात्र वैऱ्याची आहे. या दिवशी मतदारांना पैसे, दारू आदी वाटून गठ्ठा मते आपल्या पदरात पाडण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून होऊ शकतो. या शिवाय प्रचाराला पयाबंद असतानाही शेवटच्या घटकेला प्रचार करून आचारसंहितेचे उल्लंघन केले जाऊ शकते, त्यामुळे निवडणूक यंत्रणेचे भरारी पथक व पोलीस विभाग गस्त घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी १९ एप्रिल रोजी महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)पोलिसांचा तडगा बंदोबस्तनिवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू रहावी, यासाठी पोलिसांनीही तगडा बंदोबस्त ठेवला आहे. पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, सहा पोलीस निरीक्षक, ८६ पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, ५०० पोलीस हवालदार, ६०० होमगार्ड, एक राज्य राखीव दलाचे पथक, दोन आरसीएफ आणि ७५ वाहने तैनात असणार आहेत. महानगरपालिकेने ४० झोनल अधिकारी, १६०० कर्मचारी नियुक्त केले असून ४०२ पथके तयार केली आहेत.ओळखपत्र अनिवार्यया निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांना दाखविण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले असून पासपोर्ट, वाहन परवाना, पॅनकार्ड, आधार कार्ड, कर्मचाऱ्यांचा फोटो आयडी, बँकांचे फोटो असणारे पासबुक, शस्त्रास्त्र परवाना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी फोटो ओळखपत्र किंवा कुठल्याही सक्षम यंत्रणेकडून जारी करण्यात आलेले फोटो असणारे ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. २६ मतदान केंद्र संवेदनशीलमनपा निवडणुकीत ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात आहेत. ३६७ मतदान केंद्र असून त्यातील २६ केंद्र संवेदनशिल असल्याने त्याकडे भरारी पथकाचे विशेष लक्ष राहणार आहे. या निवडणुकीकरिता एकूण ४४० कंट्रोल युनिट व १२५८ बॅलेट युनिट निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रशासनाकडून १० टक्के मतदान पथके राखीव ठेवण्यात आले असून मतदान केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी ४० झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. केंद्रावर दिव्यांग व्यक्तीकरिता व्हील चेअर, रॅम्प तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा, मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्राची रंगरंगोटी करून ते सुसज्ज करण्यात आली आहेत.आज होणार बॅलेट युनिटचे वाटपजिल्हा क्रीडा संकुलातील बॅटमिंटन हॉल म्हणजे स्ट्रांग रुममधून उद्या १८ एप्रिलला कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट आणि मतदान साहित्याचे वाटप मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात येणार आहे. त्यानंतर हे अधिकारी व कर्मचारी त्यांना नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर त्याच दिवशी रवाना होणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांवर मंगळवारपासूनच पोलिसांची सुरक्षा राहणार आहे.मतदानाच्या वेळेत वाढचंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदान होत आहे. त्यासाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली होती. परंतु ऊन्हाच्या तीव्रतेमुळे मतदानाची वेळ वाढवून देण्याची विनंती काही राजकीय पक्षांनी केली. त्यानुसार मतदारांना आता सायंकाळी ५.३० ऐवजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. त्याचबरोबर ऊन्हाचा तडाका लक्षात घेता सर्व मतदान केंद्रांवर पुरेशी सावली व पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे. केंद्र परिसरात १४४ कलम लागूचंद्रपूर : १९ एप्रिल २०१७ रोजी होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान केंद्राच्या परिसरात जिल्हाधिकारी यांनी सकाळी ६ ते मतदान प्रक्रिया संपेपर्यत कलम १४४ लागू केली आहे. त्या अनुषंगाने मतदान केंद्राच्या परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती व समुहास एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सदर मतदान केंद्राच्या १०० मीटर क्षेत्राअंतर्गत परिसरात गर्दी होऊन सार्वजनिक शांततेस व अन्य हालचालींना प्रतिबंध राहील, उपरोक्त कालावधीत मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरातील मोबाईल, सेल्युलर फोन, कार्डलेस फोन, वायरलेस सेट इत्यादी स्वयंचलित व दुकाची वाहन, व्हिडीओ चित्रीकरण, फोटोग्राफी, शस्त्रे इत्यादी सवलतीवर प्रतिबंध घालण्यात आले आहे. मात्र दवाखान्याच्या गाडया, रुग्णवाहिका, दुधगाड्या, पाण्याचे टँकर्स, विद्युत व पोलीस निवडणूक कर्मचाऱ्यांच्या विहीत मार्गाने जाणाऱ्या गाडया, टॅक्सी इत्यादी वाहने बसस्टेशन, रेल्वेस्टेशन, विमानतळ, हॉस्पीटलकडे जाणारे वाहने, आजारी व अपंगाचे वाहने इत्यादी वाहनांना आदेशान्वये सुट देण्यात आली आहे. तर टॅक्सी, खासगी कार, ट्रॅक, आॅटोरिक्षा, मिनीबस, स्टेशनव्हॅन, स्कुटर इत्यादी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रतिबंध लावण्यात आले असून मतदानाचे दिवशी मतदारास मतदान केंद्रावर वाहून नेण्याच्या प्रथेस पायबंध या आदेशान्वये घालण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम वा समुह प्रचलित कायदेशिर तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील.निवडणूक काळात अफवा पसरवणे हासुद्धा गुन्हानिवडणूक काळात अफवांचा ऊत आलेला असतो. या परिस्थितीत अफवांवर आळा घालण्याकरिता पोलिसांची करडी नजर आहे. पोलीस स्टेशन अथवा पोलीस कंट्रोल रूममध्ये विनवी फोनद्वारे माहिती आपले नाव न देता व आपली तक्रार स्पष्ट शब्दात करावी लागणार आहे. या माहितीवर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. परंतु विनावी फोनद्वारे संभ्रमित माहिती देण्याचा प्रयत्न अथवा अफवा पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्यात येतील. तेव्हा कोणीही विनावी फोन करून खोटी माहिती देणे अथवा इतरत्र कुठे अफवा पसरविण्याचे कृत्य केल्यास त्यांची रवानगी तुरूगांत केली जाणार आहे.