शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

उद्याचा समृद्ध भारत बाल साहित्यिकांच्या डोळ्यात

By admin | Updated: January 23, 2017 00:36 IST

बालकांनी रचलेल्या साहित्यात पर्यावरणाचे महत्त्व, वनांचे संवर्धन, नद्यांचे शुद्धीकरण, वन्यप्राण्यांचे संवर्धन असे विषय येत आहेत.

शंकर विटणकर : चंद्रपुरात एक दिवसीय बाल साहित्य संमेलन चंद्रपूर (मिलिंद बोरकर स्मृती परिसर) : बालकांनी रचलेल्या साहित्यात पर्यावरणाचे महत्त्व, वनांचे संवर्धन, नद्यांचे शुद्धीकरण, वन्यप्राण्यांचे संवर्धन असे विषय येत आहेत. नदीमाय, झाडे लावा, ससोबा, हरीण आदी विषयांच्या कविता वाचून थक्क झालो आहे. उद्याचा समृद्ध भारत पाहायचा असेल तर तो या बाल साहित्यिकांच्या डोळ्यात पहा. त्यांना नीट समजून घ्या. त्यांची मने समृद्ध करा. भारत आपोआप समृद्ध होईल, असे प्रतिपादन नागपूर येथील बाल साहित्यिक शंकर विटणकर यांनी केले.सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचच्या वतीने एक दिवसीय बाल साहित्य संमेलन-२०१७ स्थानिक मातोश्री विद्यालयात आयोजित करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षास्थानी शंकर विटणकर होते. संमेलनाचे उद्घाटन हिंदीच्या बाल साहित्यिक डॉ. सरताज बानो काजी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, विशेष अतिथी म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, सामाजिक कार्यकर्ते संजय वैद्य आदी उपस्थित होते.विटणकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ठिकठिकाणी बाल साहित्य संमेलने होऊ लागली आहेत. ही चांगली बाब आहे. टी.व्ही.वरही बाल साहित्याचे कार्यक्रम होत आहेत. अलीकडे शालेय पाठ्यपुस्तकात बालकांच्या कविता येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सोनाली कुपरे या बालिकेची कविता बालभारतीने सहावीच्याच पाठ्यक्रमात घेतली आहे. बालकांमध्ये साहित्यासह विज्ञानादी निरनिराळ्या क्षेत्रात कार्य करण्याची प्रचंड उर्जा निर्माण होत आहे. साहित्य निर्मिती थोडी नाजूक व भावनिक बाब आहे. नाजूक धाग्यांनी मजबूत वस्त्र विणण्याचे हे कार्य आहे. कोवळ्या मनावर सुसंस्कार करणाऱ्या नितीमत्तेच्या गोष्टी मायाळू शब्दात सांगायच्या असतात. ती सर्व आव्हाने आजची बालके समर्थपणे पेलत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी विटणकर यांनी आपली एक हिंदी बालकविता सादर केली. उद्घाटक डॉ. सरताज बानो काजी यांनी बाल साहित्यिकांचे कौतुक करून त्यांच्यातील उर्जा डोळे दीपवणारी असल्याचे सांगितले.संमेलचाची भूमिका सूर्यांशचे अध्यक्ष इर्फान शेख यांनी मांडली. संचालन सीमा पाटील-भसारकर यांनी केले. (प्रतिनिधी)