शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उद्या धरणे : शिक्षण विभागाचे दिरंगाईचे धोरण

By admin | Updated: April 23, 2017 01:06 IST

गेल्या ८ महिन्यांपासून जिल्ह्यातील ७५२ शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीच्या प्रतीक्षेत आहेत.

चंद्रपूर : गेल्या ८ महिन्यांपासून जिल्ह्यातील ७५२ शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात सर्वत्र समायोजन, विषयशिक्षक पदस्थापना व बदल्या बाबत हालचाली सुरू असताना चंद्रपूर शिक्षण विभाग मात्र शांत आहे. याबाबत पुरोगामी शिक्षक समितीने प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा केला. तरीही प्रशासन वेळकाढू धोरण राबवित आहे. त्यामुळे पुरोगामी शिक्षक समितीने २४ एप्रिल रोजी लाक्षणिक धरणे आयोजित केले आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांचे रोस्टर अजूनही मंजूर नाही. अतिरिक्त शिक्षक समायोजन व विषय शिक्षक पदस्थापना वर्षभरापासून प्रलंबित आहे. परिणामी शाळेत शिक्षकांची पदे रिक्त राहिली. त्यातून अनेक शाळांमधील आठवी व पाचवीचे वर्ग बंद झाले आहेत. आंतरजिल्हा बदल्या मंजूर झालेल्यांना भारमुक्त न करता विनाकारण मन:स्ताप देण्यात येत आहे. विविध प्रलंबित समस्यांविरोधात आंदोलन करण्याचा ठराव पुरोगामी शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारिणी सभेत पारित करण्यात आला. त्यानुसार, २४ एप्रिलला जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात यत आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विजय भोगेकर, नारायण कांबळे, सायराबानो खान, मिनाक्षी बावनकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी) विविध प्रलंबित समस्या बी.एस.सी. पात्रताधारक उपलब्ध असताना एक वर्षांपासून त्यांना नियुक्ती दिली जात नाही. अनेक शिक्षक वारंवार निघणाऱ्या वैद्यकीय बिलातील त्रुटींसाठी व भेदभाव करून मंजूर होणाऱ्या देयकाबाबत त्रासलेले आहेत. आकस्मिक कारणासाठी काढत असलेली जी.पी.एफ. कर्ज प्रकरणे काम होईपर्यंतही मंजूर केली जात नाहीत. उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचा घोळ कायम आहे. वार्षिक बदल्या चार वर्षांपासून झाल्या नसल्याने कुटुंबापासून दूर राहत असलेले शिक्षक वैतागले आहेत. जिवती सारखा तालुका तर संपूर्ण अवघड क्षेत्रामध्ये घेणे अपेक्षित आहे. यासह अनेक तालुक्यातील दुर्गम,अवघड असलेली गावे यादीतून वगळण्यात आली आहेत. तालुका क्षेत्र निवड समितीने शासननिर्णयातील तरतुदीनुसार गावांच्या परिस्थितीचा योग्य अभ्यास न करता अहवाल पाठवला आहे. डी.सी.पी.एस. च्या पावत्या अद्ययावत व अचूक नाहीत. बहुसंख्य शिक्षकांचे सेवापुस्तक अद्यापही अद्ययावत करण्यात आलेले नाही.