शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला

By admin | Updated: February 23, 2017 00:33 IST

मिनी मंत्रालयाच्या ५६ तसेच पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान झाले. तब्बल आठ दिवसांनी २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

उत्कंठा वाढली : कोण मारणार बाजी, सर्वांनाच उत्सुकताचंद्रपूर : मिनी मंत्रालयाच्या ५६ तसेच पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान झाले. तब्बल आठ दिवसांनी २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धडधड वाढली असून कोण बाजी मारणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गुरूवारी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार असून दुपारपर्यंत सर्व उमेदवारांच्या भाग्याचा फैसला जाहीर होणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सर्वत्र शांततेत पार पडल्या. या निवडणुकीत अनेक बड्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर काही नवख्याचे राजकीय अस्तित्व सिद्ध होणार आहे. निवडणूक काळात प्रचारामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या होत्या. या निवडणुकीत आघाडी व युतीची ताटातुट झाल्याने सर्व पक्षांनी वेगळी चूल मांडून निवडणूक लढविली. त्यात राष्ट्रीयकृत पक्षासह अपक्ष, आघाडीचे उमेदवार रिंगणात आल्याने उमेदवारांची संख्या वाढली होती. मात्र गतवेळपेक्षा यावेळेस मतदानाचाही टक्का वाढला. त्यामुळे कोणत्या उमेदवाराने कुणाच्या मतांवर गदा आणली, हे निकालाअंती गुरूवारी दुपारनंतरच समजणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)८३४ उमेदवार रिंगणातजिल्हा परिषदेच्या ५६ गटासाठी ३१५ उमेदवार रिंगणात होते. यात १६५ पुरूष तर १५० महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर १५ पंचायत समित्यांच्या ११२ गणासाठी ५१९ उमेदवार रिंगणात होते. यात २६४ पुरूष उमेदवार तर २५५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होईल. मतमोजणी पर्यवेक्षक व सहायकाची नियुक्तीजिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्याकरिता संबधित तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नियोजन पार पडले आहे.आपणच निवडून येण्याचा उमेदवारांना विश्वास जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी उभे असलेल्या काही उमेदवारांनी आपणच निवडून येणार असा विश्वास पक्का केला आहे. त्यांनी गुलाल व फटाके खरेदीसाठी कार्यकर्त्यांना आदेशही देऊन टाकल्याचे कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळाले. जल्लोष व मिरवणूक कुठून काढायची याचेही काहींचे नियोजन झाले आहे.एकाच वेळी गट व गणाची मतमोजणीबल्लारपूर : जिल्हा परिषद गटाची व पंचायत समितीच्या गणाची मतमोजणी एकाच वेळी केली जाणार आहे. यासाठी बल्लारपुरात आठ टेबलची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी दिली. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर-बामणी जिल्हा परिषद गटात सहा उमेदवार रिंगणात होते. पळसगाव-कोठारी गटात चार महिला उमेदवार, विसापूर गणात चार महिला तर बामणी गणात पाच जण रिंगणात होते. कोठारी गणातून चार उमेदवारांच्या निवडणुकीतील परीक्षेचा निकाल मतमोजणीतून बाहेर पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विकास अहीर यांनी मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे.चोख पोलीस बंदोबस्तजिल्ह्यात सर्व तालुका मुख्यालयी मतमोजणी होणार असल्याने मतमोजणी स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निकालानंतर उमेदवार व कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत असतात. तसेच मतमोजणी परिसरातच फटाकेही फोडत असतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. आज ठरणार २३ व्या मिनी मंत्रालयाचे शिलेदारचिमूर : ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या व गाव खेड्यात शासनाच्या अनेक योजना राबविण्याचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाते. येथूनच राज्यात विधानसभेचे आमदारही घडतात. त्यामुळे जिल्हा परिषदेला विधानसभा आमदारांची शाळा म्हणूनच बघीतले जाते. गुरूवारी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ शिलेदारांची निवड इव्हीएम मशीनद्वारे होणार आहे. यामध्ये कोणाचे नशीब फडफडणार आहे, हे गुरुवारला माहित होणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पहिल्या शिलेदाराची निवड १९६२ ला झाली होती. चंद्रपूर जिल्हा परिषदेची पहिली पंचवार्षिक निवडणूक १९६२ ला झाली होती. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून अब्दुल शफीक यांची निवड करण्यात आली. त्यांनी १९६२ ते १९७२ पर्यंत कारभार सांभाळला होता.