शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

आजपासून ‘स्कूल चले हम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:09 IST

दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुन्हा शाळांची दारे उघडी होत आहे. शाळा परिसरातील किलबिल पुन्हा सुरू होत असून नवागतांचे विशिष्ट प्रकाराने स्वागत करण्यासाठी खासगी शाळांनी नियोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

ठळक मुद्देआज वाजणार शाळेची घंटा : गुलाब पुष्प व पुस्तके देऊन स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुन्हा शाळांची दारे उघडी होत आहे. शाळा परिसरातील किलबिल पुन्हा सुरू होत असून नवागतांचे विशिष्ट प्रकाराने स्वागत करण्यासाठी खासगी शाळांनी नियोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे.मार्च महिन्यात परीक्षा आटोपल्यानंतर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या देण्यात आल्या. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्यानंतर आता पुन्हा शाळांची घंटा वाजणार आहे. शाळेची मजा औरच.. त्यामुळे मुलांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. शाळांमध्ये येणाऱ्या नवागतांचे व इतर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळा व्यवस्थापनाने विशिष्ट नियोजन केले आहे. नर्सरी, केजीच्या विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन वेल-कम केले जाणार आहे. तर अनेक ठिकाणी छोटेखानीकार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंतांचे कौतुक केले जाणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठपुस्तके व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना जिल्ह्यातील पंधराही पंचायत समित्यांना देण्यात आल्या आहेत. यासोबतच पाठ्यपुस्तके पाठविण्यात आली आहेत.चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्याकॉन्व्हेंटच्या युगात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीसंख्या टिकविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. सध्या चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक २५ हजार ११० एवढी विद्यार्थीसंख्या आहे. सर्वात कमी चार हजार ५४६ विद्यार्थी पोंभूर्णा तालुक्यात आहेत. याशिवाय भद्रावती तालुक्यात १५ हजार ४८५, वरोरा तालुक्यात १५ हजार ४८४, चिमूर तालुक्यात १६ हजार १३४, ब्रह्मपुरी तालुक्यात १५ हजार ९६२, नागभीड तालुक्यात १३ हजार ७८४, सिंदेवाही तालुक्यात ११ हजार ३३८, मूल तालुक्यात ११ हजार ६४७, सावली तालुक्यात १० हजार ८३१, गोंडपिपरी तालुक्यात आठ हजार ६२७, बल्लारपूर तालुक्यात सात हजार ३८४, राजुरा तालुक्यात ११ हजार ७६९, कोरपना तालुक्यात ११ हजार ४८७ तर जिवती तालुक्यात नऊ हजार १८३ अशी विद्यार्थीसंख्या आहेत.गणवेशाचा निधीच मिळाला नाहीजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना थेट गणवेश न देता त्यांच्या बँक खात्यात संबंधित रक्कम देण्याची योजना राज्याच्या शिक्षण विभागाने मागील वर्षापासून सुरू केली़ मात्र अद्यापही समग्र शिक्षण अभियानअंतर्गत जि़ प़ ला गणवेशासाठीचे चार कोटी ९२ लाखांचे अनुदान अद्याप मिळाले नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा भुर्दंड तुर्तास गोरगरीब पालकांवर बसणार आहे.शिक्षकांच्या गृहभेटी२६ जूनपासून शाळा सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती रहावी म्हणून जिल्ह्यातील अनेक गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंदानी आज सोमवारी गावात घरोघरी जावून पालकांच्या व विद्यार्थ्याच्या भेटी घेतल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, अशी विनंती पालकांना करण्यात आली. याला पालकांकडून प्रतिसादही मिळत आहे.बालभारती व गणिताचे पुस्तक नाहीशाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून बालभारती व गणित विषयांची पुस्तके वगळून इतर सर्व पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडे पाठविली आहे. त्यामुळे २६ जूनला विद्यार्थ्यांना सर्व पाठ्यपुस्तके देण्याचा जिल्हा परिषदेचा मानस असला तरी बालभारती व गणिताचे पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार नाही आहेत. जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ७२६ विद्यार्थ्यांना ९ लाख ९१ हजार पाठ्यपुस्तकांचे पहिल्याच दिवशी वाटप करण्यात येणार आहे.