शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

आज वाजणार शाळेची पहिली घंटा

By admin | Updated: June 27, 2017 00:43 IST

दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून २७ जून मंगळवारला शाळेची पहिली घंटा वाजणार आहे.

नवागतांच्या स्वागताची जय्यत तयारी : विद्यार्थ्यांचा किलबिलाट होणार सुरूलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून २७ जून मंगळवारला शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. शिक्षण विभागाने नवागतांच्या स्वागताची तयारी पूर्ण केली असून शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले आहेत. पहिल्याच दिवशी सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार असून लोकप्रतिनिधी, अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षक नवगत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ५६४ प्राथमिक शाळा आहेत. तर ७० खासगी प्राथमिक शाळा व ४९८ माध्यमिक शाळा आहेत. पहिल्याच दिवशी १ हजार ५६४ प्राथमिक शाळांमध्ये जवळपास ३३ हजारच्या आसपास विद्यार्थी दाखल होणार आहेत. शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याचे सर्व शाळांना निर्देश देण्यात आले असून या कार्यक्रमाला क्षेत्रीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच पहिल्या दिवशी गावात प्रभात फेरी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप, पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला फुल देऊन स्वागत, शालेय पोषण आहारात गोड पदार्थ जेवू घालणे असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याबाबत सर्व शाळांनी नियोजन केल्याची माहिती, प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांत शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी व तो नियमीत शाळेत यावा, यासाठी शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्याचा अविस्मरणीय क्षण राहील, याची काळजी घेण्यात शिक्षण विभाग व्यस्त आहे. शिक्षण विभागासह इतर विभागातील वर्ग २ व त्यावरील अधिकाऱ्यांना प्रवेशोत्सवासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सर्व शाळांतील शिक्षकांना वर्षभर करायच्या कामांचा संकल्प करायचा असून १०० टक्के पटनोंदणी व दर्जेदार शिक्षणाचा निर्धार करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.सर्व विषयांची पुस्तके पोहोचलीजिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप केली जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने सर्व पंचायत समित्यांना पुस्तके पाठविली असून केवळ तेलगू माध्यमाच्या सातव्या वर्गाचे विज्ञान विषयाचे पुस्तक अद्याप पोहोचलेले नाही. उर्वरीत सर्व विषयांची पुस्तके पोहचली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. शैक्षणिक साहित्यांची दुकाने सजलीशाळा सुरू होण्याच्या तोंडावर चंद्रपूरसह अनेक शहर व ग्रामीण भागातही शैक्षणिक साहित्याने दुकाने सजली आहेत. पाठ्यपुस्तके, दफ्तर, स्टडी टेबल असे विविध साहित्य विक्रीचे दुकान लागले असून चंद्रपुरात अनेक मार्गावर रस्त्यावरच दुकाने लागलेली आहेत. पावसाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे पालक छत्री, रेणकोट अशा साहित्याचीही खरेदी करीत आहेत.प्रवोशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून सर्व शाळांमध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार असून या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. - राम गारकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प., चंद्रपूर.