शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
2
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
3
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
4
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
5
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
6
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
7
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
9
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
10
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
11
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
12
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
13
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
14
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
15
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
16
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
17
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
18
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
19
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
20
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग

आज ‘सर्किट हाऊस’चा चंद्रपुरात प्रयोग

By admin | Updated: February 8, 2016 01:13 IST

लोकमत सखी मंच चंद्रपूर आणि आयएमए असोसिएशन चंद्रपूर तसेच श्री ज्ञानेश्वरी महाबहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त

चंद्रपूर : लोकमत सखी मंच चंद्रपूर आणि आयएमए असोसिएशन चंद्रपूर तसेच श्री ज्ञानेश्वरी महाबहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ८ फेबु्रवारीला रात्री ९ वाजता स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे ‘सर्किट हाऊस’ या धमाल विनोद नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.या नाटकात प्रमुख भूमिकेत सिनेअभिनेते संजय नार्वेकर असुन खबरदार, जबरदस्त, अगं-बाई-अरेच्या, इंडियन, वास्तव यासारख्या हिंदी-मराठी सुपरहिट चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. विनोद कलाकार म्हणून ते परिचित आहेत. आज ‘सर्किट हाऊस’ या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना त्यांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच अभिनेते भुषण कडू यांचीही या नाटकात प्रमुख भुमिका असून चेहराफेरी, टार्गेट, माझी माणसे, श्यामची मम्मी आदी नाटक व सिनेमात त्यांनी अभिनय केला आहे. या नाटकात अन्य कलावंतांमध्ये अनिल कामत, प्रमोद कदम, राहुल कुलकर्णी, अंकुर वाढवे, हेमांगी वेलनकर, श्वेता घरत, मयुरा रानडे यांचा समावेश आहे.लोकमत सखी मंच आणि त्यांच्या परिवाराकरीता तिकीट शुल्कात विशेष सूट असुन जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी नाटकाचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे ९०११३२२६७४, ७२४९७३२७२१, बल्लारपूर तालुका संयोजिका-९२२६७४६२००, भद्रावती तालुका संयोजिका अल्का वाटकर- ८८८८४६३२४६, उज्वला खिरटकर वरोरा- ९४२१९२६४७४, बी.यू. बोर्डेवार राजुरा- ९९२२९०४१२५, हेमलता झटाले ऊर्जानगर- ९४२३४१८९२४, भारती ठाकरे ९८५०५९६४६२ विठ्ठल मंदिर वार्ड, वंदना मुनघाटे ८८०६६२१०११, मालती कुचनवार ९६६५४९४०४०, मंजुषा भिमनवार ९८८१७२८६८७, अंजु चिकटे ९८९०३०४५७३, ज्योती पडिशालवार ९४२०४४६६५१, पूजा पडोळे ८८०५९८५५९२, प्रिती घाटे ९८२३४००१५७, स्नेहा धानोरकर ७६२०३०५९०३, किरण बल्की ९८६०९०११२४, सरिता मालू ९८५०४७१७०५, सुषमा नगराळे ९४२२१७५४६८, अर्चना मेहेरे ९४२२०१२२८८, पौर्णिमा डाहुले ७३८७५६११९१, रेखा महाजन ९५९५३४००६७, ज्योती दिनगलवार,, सोनाली धनमने ७२७६९७५५९, बिंदिया वैद्य, ज्योती एकोणकर, योगिता कुंटेवार, भानुमती बडवाइक, मंगला रूद्रपवार ९६८९६५३००८, रेखा बोबाटे ९७६६०१९८९५, मनिषा आंबेकर ९५७९१५०३९६, यांच्याशी संपर्क साधावा. (शहर प्रतिनिधी)नार्वेकर, कडू यांनी साधला सखींशी संवाद८ फेब्रुवारीला चंद्रपुरात ‘सर्किट हाऊस’ या विनोद नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी स्थानिक आयएमए सभागृहात नाटकातील मुख्य कलावंत संजय नार्वेकर, भूषण कडू व अन्य सहकलावंतांनी संखीशी संवाद साधला. या कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशनचे चंद्रपूर अध्यक्ष डॉ.अशोक भुक्ते, सचिव डॉ.प्रसाद पोटदुखे, चंद्रपूर लोकमतचे शाखा व्यवस्थापक विनोद बुले, नगरसेवक संजय वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सखींनी विचारलेल्या प्रश्नांची संजय नार्वेकर व भूषण कडू यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी सखी व नाट्यकलावंत यांच्या एक मिनिट स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंचच्या विदर्भ संयोजिका नेहा जोशी व चंद्रपूर जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे यांनी केले.