शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

‘त्यांना’ ताडोबाची नि:शुल्क सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:26 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची वेबसाईट अद्ययावत करावी व त्यात ताडोबा अभयारण्याशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण माहिती देण्यात यावी. तसेच स्वातंत्र्य संग्राम सैनिक, दिव्यांग बांधव, गुणवंत विद्यार्थी यांना रोज सफारी नि:शुल्क उपलब्ध करावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची वेबसाईट अद्ययावत करावी व त्यात ताडोबा अभयारण्याशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण माहिती देण्यात यावी. तसेच स्वातंत्र्य संग्राम सैनिक, दिव्यांग बांधव, गुणवंत विद्यार्थी यांना रोज सफारी नि:शुल्क उपलब्ध करावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.येथील नियोजन भवनात शुक्रवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.वनविभागातर्फे गेल्या वर्षीच्या तुलनेत वनपर्यटन किती वाढले, याबाबतचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. रिसोर्ट मालक व जिप्सी चालक यांच्या समस्या वनमंत्र्यांनी जाणून घेतल्या. यावेळी बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ताडोबाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती तातडीने करण्यात यावी. एक कॉल सेंटर सुरू करून त्या माध्यमातून पर्यटकांना संपूर्ण माहिती मिळण्याची व्यवस्था करण्यात येईल व पर्यटकांना आपल्या समस्यासुध्दा सांगता येईल, अशी व्यवस्था करण्यात येईल, असेही ते म्हणाले. गाईड व वाहन चालकांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देश यावेळी वनमंत्र्यांनी दिले. सेवानिवृत्त वनकर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना नि:शुल्क सफारीचा लाभ देण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिले.यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी, उपवनसंरक्षक के. के. मिश्रा, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.शेताच्या बांधावर वृक्ष लागवडसामाजिक वनिकरण शाखेच्या मदतीने आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्ष लागवड करता येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय १२ एप्रिल २०१८ रोजी निर्गमित झाला आहे, अशी आनंददायी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतामध्ये करावयाच्या वृक्ष लागवडीमध्ये साग, चंदन, खाया, बांबू , निम, चारोळी, महोगनी, आवळा, हिरडा, बेहडा, अर्जुन, सीताफळ, चिंच, जांभूळ, बाभूळ, अंजन, बिबा, खैर, आंबा, काजू (रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांसाठी), फणस, ताड, शिंदी, सुरु, शिवण, शेवगा, हादगा, कडीपत्ता, महारूख, मॅजियम, मेलिया डुबिया यासारख्या प्रजातींच्या वृक्षांची लागवड करता येणार आहे. रोपांचा दरही शासन निर्णयातील सहपत्रात निश्चित करून दिला आहे. वृक्ष लागवडीचा कालावधी १ जून ते ३० नोव्हेंबर असा राहणार असून यासंबंधीचे नियोजन कालबद्धरित्या सामाजिक वनिकरण शाखेने तयार करावयाचे आहे, अशी माहितीही ना. मुनगंटीवार यांनी दिली.अनधिकृत रिसोर्टवर कारवाईचे संकेतताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा फायदा घेत अनेकांनी ताडोबाच्या अवतीभवती अनधिकृत रिसोर्ट तयार केल्याची माहिती मिळाली आहे. ज्यांनी अनधिकृत रिसोर्ट बांधले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.