नागभीड : भारतीय बाजारपेठ एवढी अविश्वासाच्या भोवऱ्यात सापडली आहे की, विक्रेत्यांना आपल्या मालाच्या गुणवत्तेचे प्रमाणक सिद्ध केल्याशिवाय खरेदीदार तो माल किंवा सामान विकत घ्यायला तयार होत नाही. नागभीडमध्ये हाच प्रकार घडत आहे. येथे मध विक्रेत्यांनी मधाचे पोळे दाखविले तेव्हाच नागरिकांनी ते मध विकत घेतले.बाजारपेठेत भेसळीचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. एवढेच नाही तर प्रत्येक ब्रॉन्डेड वस्तुच्या डुप्लीकेट वस्तु बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची अवस्था अतिशय संभ्रमीत झाली आहे. एखादी अस्सल वस्तु समोर असेल, तरी ती अस्सलच आहे. यावर तो विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे अस्सलतेवर प्रश्नचिन्ह तयार होतात. तालुक्यातील जंगल परिसरात राहणाऱ्या मध विक्रेत्यांसमोर नेमका हाच प्रश्न निर्माण झाला आहे. जंगलातील रानमेवा आणि मध गोळा करून त्याची विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय आणि तोही परंपरेने चालत असलेला पण हल्ली भेसळीच्या युगात लोक त्यांच्या मालाच्या गुणवत्तेवरच शंका घेऊ लागल्याने आपला माल खरोखरच अस्सल आहे, हे सिद्ध करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नागभीड येथे काही मध विक्रेते मध विक्री करण्यासाठी आले तेव्हा, त्यांनी सोबत मधाचे पोळेही आणले होते. याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी ‘लोकमत’ला सांगितलेली आपबिती खरोखरच धक्क करणारी आहे.ते म्हणाले, आम्ही नुसता मध विक्रीला आणत होतो तेव्हा आमच्या मधावर लोक नानाविध शंका घेऊन विकत घेण्यास नकार द्यायचे. पण आता मधा सोबत मधाचे पोळे आणत आहोत, तेव्हापासून मध विकत घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मध विक्रेत्यांवर गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ
By admin | Updated: February 12, 2015 00:49 IST