ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघिण जंगलात लावलेल्या तारांमध्ये शनिवारी पहाटे मृतावस्थेत आढळली.
तारांमध्ये अडकून ताडोबातील वाघिणीचा मृत्यू
ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी घडली असावी घटना
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघिण जंगलात लावलेल्या तारांमध्ये शनिवारी पहाटे मृतावस्थेत आढळली. ही वाघीण तारांमध्ये दोन दिवसांपूर्वीच अडकली असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील खातोडा कोअर झोनमध्ये २ वर्षांची ही वाघीण मृतावस्थेत आढळली. ती तारेच्या कुंपणात अडकली होती. शनिवारी पहाटे ही घटना समोर आली असून या भागातील वन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. यात मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे हे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एन. आर. प्रवीण यांच्यासह अनेक वनअधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे.