शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नदी परिसरातील झुडपात वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:34 IST

सिंदेवाही वनपरिक्षेत्रांर्गत येणाऱ्या भेंडाळा बिटामध्ये भेंडाळा व चिखलमिनघरी नदीच्या काठावर झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले. त्यामुळे शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी वाघाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. वनविभागाची चमू वाघावर नजर ठेवून असून उशिरापर्यंत वाढ झुडूपातच ठाण मांडून होता.

ठळक मुद्देबघ्यांची गर्दी : भेंडाळा-चिखलमिनघरी येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही वनपरिक्षेत्रांर्गत येणाऱ्या भेंडाळा बिटामध्ये भेंडाळा व चिखलमिनघरी नदीच्या काठावर झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले. त्यामुळे शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी वाघाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. वनविभागाची चमू वाघावर नजर ठेवून असून उशिरापर्यंत वाढ झुडूपातच ठाण मांडून होता.सिंदेवाही तालुक्यात सर्वत्र वाघाची दहशत पसरली आहे. नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले असून वाघावर पाळत ठेवून आहेत. असे असताना शुक्रवारी सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास भेंडाळा येथील गजानन वसाके शेतात गेले असता त्यांना वाघाचे दर्शन झाले. त्यांनी ही माहिती वनविभाग व गावकºयांना दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. झुडुपात बसलेल्या वाघाला हुसकावून लावण्यासाठी फटाके फोडण्यात आले. मात्र वाघाने जागा सोडली नाही. हळूहळू बघ्यांची गर्दी वाढत गेली. त्यामुळे सिंदेवाही पोलिसांना पाचारण करण्यात आले. तसेच दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले.मात्र वाघ दिवसभर झुडुपातच लपून बसलेला होता. दिवसभर परिसरात शेतावर नागरिक असल्याने त्याला हुसकावून लावणे कठीण असल्याने सायंकाळी वाघाला हुसकावून लावण्यात येईल, असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वाघ लपून बसलेला आहे, तेथून चिखलमिनघरी गाव ४०० ते ५०० मिटर अंतरावर तर पलीकडे भेंडाळा गाव आहे.