शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

कोठारी परिसरात वाघाचा धुमाकूळ

By admin | Updated: December 28, 2015 01:25 IST

कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत कोठारी, काटवली, कन्हारगाव, कुडेसावली, कवडजई बिटात मागील पंधरा दिवसांपासून बिबट व वाघाने ...

शेतकऱ्यांत दहशत : १५ दिवसात १० जनावरे ठारकोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत कोठारी, काटवली, कन्हारगाव, कुडेसावली, कवडजई बिटात मागील पंधरा दिवसांपासून बिबट व वाघाने गावाशेजारी येऊन धुमाकूळ घातला आहे. गावातील गोठ्यात व जंगलात चरण्यासाठी जाणाऱ्या जनावरांवर हल्ला करून दहा जनावरांना ठार केल्याने जंगल शेजारी गावात व शेतकऱ्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.कोठारी येथील शेतकरी बबन मोरे, भाऊजी विरुटकर व दादाजी फरकाडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर तीन दिवस सतत हल्ला करून ठार केले तर कुडेसावली येथील शेतकऱ्यांच्या जनावरांवर गावालगत रस्त्याच्या कडेला दोन जनावरे तसेच काटवली, बामणी येथील दोन गाई व कवडजई व परसोडी येथील तीन जनावरांवर हल्ला चढवून जनावरांचा फडशा पाडला आहे. त्याचप्रमाणे गणपूर, कन्हारगाव, देवई व भटारी येथील पाच ते सहा जणावरांना ठार केल्याची घटना घडली. कोठारी गावाशेजारी असलेल्या तलावात पाणी पिण्यासाठी जाणाऱ्या जनावरांवर बिबट्याने व वाघाने हल्ला केल्याची घटना घडली.वाघ-बिबट गावाशेजारी गावात येऊन हल्ला करण्याच्या प्रकारात दिवसागणिक वाढ होत आहे. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. या प्रकाराची वनविभागाने वेळीच दखल घेऊन मृत जनावरांची नुकसानभरपाई देण्यात यावी.गुराख्यात दहशतजंगलात जनावरांना चराईसाठी जाणाऱ्या गुराख्यांना वाघ-बिबट्याचे रोज दर्शन होत असल्याने जंगलात जनावरांसह प्रवेश करणे दुरापास्त झाले आहे. अशात जनावरे जंगलात नेणे धोकादायक झाले आहे. जनावरांवर हल्ला करणाऱ्या या हिंस्त्र प्राण्यांपासून गुराख्याच्या जीवितास धोका निर्माण झाला असून जनावरांची चराई गावाशेजारी केली जात आहे.शेतकऱ्यांनी जागल बंद केलीशेतात शेतपिकांची राखण करण्यासाठी व जंगली श्वापदापासून रक्षण करण्यासाठी शेतकरी जागल करीत आहेत. मात्र वाघ-बिबट्याच्या दैनदिन उपद्रवाने शेतकरी दहशतीत असून आता रात्रीची जागल बंद केल्याने शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिला तर उभ्या पिकांची नासाडी जंगली प्राणी करीत आहेत. तसेच जनावरांवर वाघ-बिबटाचे हल्ले होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. निसर्ग व जंगली प्राणी तसेच शासनाच्या नियमात अडकलेले शेतकरी मदत कुणाकडे मागावी, या विवंचनेत सापडले आहेत.पादचाऱ्यांना वाघ-बिबटाचे दर्शनकोठारी-तोहोगाव, कोठारी-गोंडपिपरी, देवई व कन्हारगाव या मार्गावरुन दुचाकी, चारचाकी व पायदळ जाणाऱ्या लोकांना वाघाची जोडी तसेच बिबटाची जोडीचे रोज वेळीअवेळी दर्शन होते. यामुळे पादचारी भयभीत झाले आहेत. संध्याकाळी ६ वाजतापासून या मार्गावरील वाहतूक बंद होत आहे. सहा वाजतानंतर कुणीही या मार्गावरुन जाण्याची हिंमत करीत नाही. सर्व रस्त्यावर संध्याकाळी शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहेत.बंदोबस्ताची मागणीकोठारी वनपरिक्षेत्रातील बहुतेक गावे व शेती जंगल शेजारी असून वाघ-बिबटाच्या दहशतीने सर्व परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अशात वनविभागाने या प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान व नुकसान भरपाईची कार्यवाही त्वरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता धीरज बांबोडे यांनी केली आहे.