शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मानवी वाघांकडून वाघांचे प्रदर्शन

By admin | Updated: July 29, 2016 01:02 IST

वाघ हा सदा जंगलात राहणारा, जंगलाचा राजा आणि हिंस्र प्राणी! तो पर्यावरण रक्षकही आहे.

वसंत खेडेकर बल्लारपूर वाघ हा सदा जंगलात राहणारा, जंगलाचा राजा आणि हिंस्र प्राणी! तो पर्यावरण रक्षकही आहे. वाघ म्हणजे जिवाला भीतीच ! त्यामुळे वाघ समोर दिसला वा त्याचे नाव घेतले तरी पाचावर धरण बसते. तो पिंजऱ्याच्या आत असला की, त्याची काही भीती नाही. सर्कशीतील पिंजऱ्यात तो जेरबंद असला तरी त्याला जवळून निरखून बघता येते. तसेच, सर्कशीच्या खेळात, खेळाच्या रिंगणात त्याला आपण मोकळे बघतो. ते बघत असताना, चवताळून रिंगणाबाहेरुन तो प्रेक्षकांमध्ये घुसला तर, या कल्पनेने आपण पार घाबरुन जातो. (आता, सर्कशीत वाघावर बंदी आली आहे.) त्यामुळे वाघाला प्रत्यक्ष बघायचे असल्यास व्याघ्र प्रकल्पातच जावे लागते. अर्थात हे साऱ्यांना शक्य नाही. पण, वाघाचे आकर्षण सदा सर्वकाळ सर्वांच्या मनात असतेच ! या आकर्षणापायीच असावे, माणूस वाघ बनतो. वाघासारखा साज आपल्या अंगावर चढवतो आणि आपले पूर्ण शरीर वाघासारख्या रंगांनी रंगवितो. त्याद्वारे वाघाचे दर्शन लोकांना घडवित असतो. या मानवी वाघाला ‘परत वाघ’ असे म्हटले जाते. परत वाघ हा लहान-मोठ्यांचा लाडका आणि आकर्षणाचा बिंदू ! मानवी वाघ बनणे व ऐटदार पैतरे टाकत धडाकेबाज आणि विशिष्ट प्रकारच्या वाघांच्या तालावर नाचणे हा प्रकार भोसले काळापासून सुरू झाला, असे सांगतात. तेव्हापासून तर आजतागायत विदर्भात ही परंपरा सुरू आहे. गणेशोत्सव, मोहरम, शारदा- दुर्गा उत्सवात वाघ बनून नाचायला उधाण येते. वाघाला शोभावी अशी भरदार अंगकाठी, चेहरा तेज असला, की असे परत वाघ डोळ्यांची पारणे फेडतात. परत वाघ बनणे सोपे नाही. ज्याला तो वाघ बनायचे असेल त्याला पाय, हात व छातीवरील केस काढावे लागतात. त्यानंतर अंगभर पांढऱ्या रंगाचा पेंट लावला जातो. तो रंग सुकण्याची वाट बघावी लागते. त्यावर वाघासारखे पिवळे, काळे पट्टे फिरविले जातात. डोक्यावर वाघाचा विशिष्ट टोप आणि भरदार मिशांचा सेट चेहऱ्यावर फिट केला जातो. सोबतच कमरेभोवती वाघासारखी झुपकेदार शेपटी! या साऱ्या कठीण प्रक्रियेनंतर मानवी वाघ सजतो. रंग उडू नये, टोप व मिश्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या पेहरावात त्याला सांभाळावी लागते. मानवी वाघ पेंटर रंगवितात. वाघ रंगविणारे काही खास पेंटर आहेत. त्यांच्याकडे जावे लागते. बल्लारपूर व चंद्रपूरला मोजकेच तसे पेंटर आहेत. मानवी वाघाचा प्रकार मुंबईकडे नाही. याची माहिती मुंबईकरांना व्हावी, याकरिता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथील तिघांना परत वाघ बनवून मुंबईला गतवर्षी नेले होते. व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांनी बल्लारपूर येथील या तिघा मानवी वाघांच्या तालावर नृत्य केले. हा नाविण्यपूर्ण प्रकार बघून मुंबईकर व अमिताभ बच्चन प्रभावित आणि खूश झाले. अमिताभ मंचावरुन खाली उतरुन मानवी वाघांची माहिती त्यांच्याकडून घेत ते त्यांच्यासोबत चांगले २० मिनिटे रमत राहिलेत. असे आहे मानवी परत वाघाचे आकर्षण !