शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बामणी, येडशी, केम परिसरात वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

केमच्या राजू टेकाम यांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बिबट केम गावात शिरला होता. त्या आधी एकाची कालवड मारली व घरात शिरून दोन बकऱ्यांना मारून गेला, तर येडशीच्या लल्लूमणी प्रसाद यांची आतापर्यंत १० च्या वर जनावरे मारली. बामणीमध्ये फुकटनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी मनोहर शेंडे यांची कालवड मारली. या घटनेने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : बल्लारपूर वन परिक्षेत्रालगत येणाऱ्या बामणी, येडशी, केम परिसरात वाघ आणि बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मागील पाच महिन्यांत १५च्या वर वाघ आणि बिबट्याने ताव मारला आहे. वाघाच्या दहशतीने केम व येडशीच्या नागरिकांनी वनात जाणे बंद केले आहे, तर उन्हाळल्यातही अंगणात न झोपता रात्री घराची दारे बंद करून झोपावे लागले आहे.केमच्या राजू टेकाम यांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बिबट केम गावात शिरला होता. त्या आधी एकाची कालवड मारली व घरात शिरून दोन बकऱ्यांना मारून गेला, तर येडशीच्या लल्लूमणी प्रसाद यांची आतापर्यंत १० च्या वर जनावरे मारली. बामणीमध्ये फुकटनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी मनोहर शेंडे यांची कालवड मारली. या घटनेने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. बामणीच्या रेल्वे लाईनच्या बाजूने बिबट व वाघाचे येणे सुरूच आहे, तर बामणी नाल्याकडून वाघ दिवसा जंगलात जातो व रात्री नाल्यात बसतो. वनखात्याने लावलेल्या कॅमेऱ्याच्या ट्रॅपमध्ये वाघाच्या हालचालींवर वनखाते लक्ष ठेवून आहे. या परिसरात वाघाचा व बिबट्याचा वावर वाढल्याने मागील तीन महिन्यांपासून वनखात्याने वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे व त्यांच्या पथकाने सर्चिंग ऑपरेशन सुरू केले आहे. झुडपात वाघ लपून बसू नये यासाठी वनविभागाने दोन दिवसांपासून नाल्याजवळील झुडपे जेसीबीने साफ करणे सुरू केले आहे. वाघाला जेरबंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.  सतत्या वाघाच्या दर्शनाने परिसरात मोठी दहशत पसरली आहे. उन्हाळ्यामध्ये या परिसरातील नागरिक घराबाहेर अंगणात झोपायचे मात्र वाघाच्या भीतीने घरातच झोपावे लागत आहे. वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे,

जेव्हापासून या परिसरात वाघ आणि बिबट्याने जनावरे मारणे सुरू केले तेव्हापासून वनविभाग सतत वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे व ग्रामवासीयांना मदत करीत आहे. त्यांचे दररोज सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे.- सुभाष ताजने, सरपंच,ग्रामपंचायत, बामणी.

 

टॅग्स :Tigerवाघ