राजुरा : राजुरा तालुक्यातील नलफडी येथील एका जणाच्या घराच्या अंगणात दगडाखाली लवपून ठेवलेले वाघाचे दात व मिशा वनाधिकाऱ्यांनी जप्त केल्या. याप्रकरणी एकाला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली.राजुरा वन परिक्षेत्रात वन अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील नलफडी येथील मनोज रावजी चुनारकर यांनी तेथील मारुती बाळू बावणे यांच्या घराच्या अंगणात दगडाखाली वाघाचे नख, मिशा व दात चार-पाच दिवसांपूर्वी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी वनाधिकाऱ्यांनी नलफडीला जाऊन चौकशी केली असता दगडाखाली वाघाचे नख, मिशा व दात आढळून आले. वनविभागाने ते जप्त केले. चौकशीसाठी नलफडी येथील अनिल पांडुरंग चांदेकर याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास क्षेत्र सहाय्यक कट्टकू व देशकर करीत आहे.
नलफडी येथे वाघाचे दात व मिशा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST