शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात बाम्हणी येथील घरात वाघाने मांडले ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 10:55 IST

चंद्रपूर : तालुक्यातील बाम्हणी येथील श्रीकांत देशमुख यांच्या घरात रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देनागरिकांची उसळली गर्दी

घनश्याम नवघडेचंद्रपूर : तालुक्यातील बाम्हणी येथील श्रीकांत देशमुख यांच्या घरात रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या वाघाला बघण्यासाठी परिसरातील पाच हजारावर लोकांनी बाम्हणीकडे धाव घेतली. रात्री ८ वाजेपर्यंत वाघाने घरातच ठाण मांडले होते. आणि त्याला बघण्यासाठी गर्दीही कायम होती.

दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा वाघ गावकऱ्यांना दिसून आला. बघता बघता ही माहिती पंचक्रोशीत पोहचली आणि या वाघाला बघण्यासाठी एकच गर्दी उसळली. दरम्यान, वनविभागाला ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलीसही आले. त्यांनी लोकांना हटविण्याचे बरेच प्रयत्न केले. पण ते निष्फळ ठरले. घरात दडून असलेल्या या वाघास ताब्यात कसे घ्यायचे, यावर वनविभागाचे अधिकारी यांचे विचारविनिमय करण्यात झाल्यानंतर वाघ ज्या घरात बसला होता, त्या घराभोवती जाळे टाकण्यात आले. पण वाघ बाहेर पडला नाही. रात्री ८ वाजेपर्यंत वाघ घरातच होता. दरम्यान वाघास बेशुद्ध करून ताब्यात घेण्याबाबत वन अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले होते. पण ते कसे करायचे याचे लोकेशन मिळत नव्हते.मनोहर पाल गंभीर जखमीवाघाने ज्या घरी दडी मारली, त्याच्या बाजूलाच मनोहर पाल हे शेताची नांगरणी करीत होते. वाघ त्यांच्या नजरेस पडताच ते वाघ वाघ असे जोराने ओरडले व वाघ त्यांच्या बैलांवर हल्ला करेल म्हणून ते लगबगीने औताला जुंपलेले बैल सोडत असतानाच या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या कानाजवळ चांगलीच दुखापत झाली. त्यांना लागलीच नागभीडच्या ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला हलविण्यात आले.

टॅग्स :Tigerवाघ