शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिगरबाज आजोबा; वाघाच्या जबड्यातून पत्नीला खेचून आणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 15:11 IST

पतीचा वाघावरच प्रतिहल्ला

नागभीड (चंद्रपूर) : कोणाचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. त्यांनी तिला खरोखरच साक्षात मृत्यूच्या जबड्यातून ओढून आणले. त्यांच्या या हिमतीची, या थराराची परिसरात चांगलीच प्रशंसा होत आहे.

सोमेश्वर भुरले असे या जिगरबाज आजोबांचे नाव असून, ते तालुक्यातील ढोरपा येथील रहिवासी आहेत. सोमेश्वर यांची पत्नी सविता शेतात पडलेल्या धानाच्या ओंब्या वेचत होती. तर सोमेश्वर बाजूच्याच बांधात गवत कापत होते. सविता ओंब्या वेचण्याच्या कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला.

कुऱ्हाडीच्या धाकावर वाघाशी सामना

अचानक झालेल्या हल्ल्याने ती भांबावली. मात्र, प्रसंगावधान राखून तिने वाचवा वाचवा असा आरडाओरडा केला. या आवाजाने बाजूलाच गवत कापत असलेला तिचा पती धावत आला. तेव्हा पत्नीला वाघाच्या रुपाने साक्षात काळच फरफटत ओढून नेत असल्याचे त्यांनी पाहिले; पण स्वतःचा तोल ढळू न देता ते धाडसाने वाघाच्या दिशेने धावले. स्वतःजवळ असलेली कुऱ्हाड वाघाच्या दिशेने फेकून मारण्याचे नाटक करीत दबक्या पावलांनी वाघाजवळ गेले.

वाघ जागचा हलेना अन् पतीही माघारी वळेना!

सोमेश्वर हातात कुन्हाड घेऊन वाघाच्या दिशेने धावून गेले. या पवित्र्याने सविताला जबड्यात घेतलेला वाघही गांगरून गेला; पण सविताला जबड्यात घेतलेला वाघ काही जागचा हलत नव्हता आणि सविताचे पती सोमेश्वरही माघारी वळायला तयार नव्हते.

हळूहळू सोमेश्वर वाघाजवळ पोहोचले आणि वाघावर कुऱ्हाड उगारून त्यांनी सवितास वाघाच्या जबड्यातून बाहेर काढून वाघाकडे पाहत माघारी पावलाने काही अंतर ओढत नेले. यानंतर वाघ काही अंतरावर दूर गेला. नंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांची मदत घेत पत्नी सविताला दवाखान्यात नेले. सवितावर आता ब्रह्मपुरी येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

यापूर्वीही परिसरात वाघाचे हल्ले

दरम्यान, ढोरपा मोर्शी परिसरातीलच टेकरी, पान्होळी, लाखापूर या गावात महिनाभरात वाघांनी शेतकरी व गुराख्यांवर हल्ला करून ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. शेतीची कामे करावी कशी, हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. वनविभागाने या वाघांचा बदोबस्त करावा, अशी गावकरी व शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Tigerवाघhusband and wifeपती- जोडीदारchandrapur-acचंद्रपूर