सोनेगाव रेती घाट : दोन पोकलॅडला ठोकले सीललोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : सोनेगाव रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा केल्याप्रकरणी तहसीलदार यांनी तीन रेतीचे टिप्पर बुधवारी रात्री पकडले. तर गुरुवारी सकाळी त्याच घाटावर दोन पोकलॅडला सील ठोकण्यात आले. या प्रकरणात टिप्पर चालक जब्बार शेख रज्जाक शेख रा. नागपूर यास अटक करण्यात आली.सदर सोनेगाव घाट लिलाव पद्धतीने देण्यात आला आहे. घाट मालकाने काही अटी पाळायच्या आहेत.या अटी-शर्ती शासनाच्या नियमानुसार बंधनकारक असूनही बहुतांश घाटमालक याकडे दुर्लक्ष करून यांत्रिक पद्धतीने व नियमांचा भंग करून उत्खनन करीत आहेत. ही बाब जिल्हाधिकारी आशुतोष सलील व उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विद्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार सुभाष पुंडेकर, नायब तहसीलदार राठोड, मंडळ अधिकारी चहारे, बोधे, खैरे, तलाठी येरमा, सपाटे, दानवे व इतर कर्मचाऱ्यांनी धाड टाकून टिप्पर क्रं. महा-४०-एके-१४९९, क्रमांक महा-४०-वाय-९६९९ व महा-४० एसी ३८८० हे तीनही टिप्पर रेतीसह जप्त केले तर टिप्पर चालक जब्बार शेख रज्जाक शेख रा. नागपूर यांनी अरेरावी केल्याने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला व त्यास अटक करण्यात आली.
रेती प्रकरणात तीन टिप्पर जप्त
By admin | Updated: July 14, 2017 00:18 IST