शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

चंद्रपुरात दररोज तीन हजार एचआरसीटी तपासण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. लक्षणे नसणारे व सौम्य लक्षणे असणारे पॉझिटिव्ह रुग्ण दिवसागणिक वाढतच आहेत. चंद्रपूर शहरातही रुग्णसंख्येने धडकी भरविली. शासकीय व खासगी कोविड रुग्णालये फुल्ल झाली. त्यामुळे लक्षणे नसणाऱ्या शहरातील शेकडो नागरिक एचआरटीसी चाचणीसाठी खासगी तपासणी केंद्रांमध्ये गर्दी करीत आहेत. 

ठळक मुद्देशहरात चार खासगी रूग्णालयानांच परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संशयित अथवा पॉॅझिटिव्ह रुग्णाच्या फुफ्फुसाच्या आत विषाणूने किती टक्के बाधित केले, याचे निदान करून पुढील उपचारासाठी एचआरसीटी तपासणी महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ही तपासणी करून घेण्यासाठी चंद्रपुरातील चार खासगी हॉस्पिटलमध्ये तोबा गर्दी उसळली आहे. दररोज सुमारे तीन हजार तपासण्या होत असल्याची माहिती सूत्राने दिली.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. लक्षणे नसणारे व सौम्य लक्षणे असणारे पॉझिटिव्ह रुग्ण दिवसागणिक वाढतच आहेत. चंद्रपूर शहरातही रुग्णसंख्येने धडकी भरविली. शासकीय व खासगी कोविड रुग्णालये फुल्ल झाली. त्यामुळे लक्षणे नसणाऱ्या शहरातील शेकडो नागरिक एचआरटीसी चाचणीसाठी खासगी तपासणी केंद्रांमध्ये गर्दी करीत आहेत. दररोज सुमारे तीन हजार एचआरटीसी चाचण्या होत असल्याचा अंदाज आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात डॉ. मानवटकर, डॉ. अल्लूरवार, डॉ. माडूरवार, डॉ. मेहरा हॉस्पिटलला सीटी स्कॅन, एचआरसीटी चाचणी करण्यास परवानगी आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व शासनाच्या नियमांचे पालन करूनच तपासण्या केल्या जात असल्याचा असा दावा मान्यताप्राप्त खासगी हॉस्पिटल्सने केला आहे.

एचआरसीटी टेस्ट म्हणजे काय? 

कोरोना महामारीत एचआरटीसी टेस्ट एवढे महत्त्व का आले, असा प्रश्न पुढे आला आहे. चंद्रपुरातील एका प्रसिद्ध खासगी रेडिओलॉजिस्टने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, एचआरसीटी टेस्टमध्ये छातीचे स्कॅनिंग केले जाते. यात फुफ्फुसामध्ये न्यूमोनियाचा संसर्ग किती प्रमाणात झाला याचे अचूक निदान होते.

परस्पर तपासणीने होम क्वारंटाईन अनेकांनी खासगी हॉस्पिटल्समधून परस्पर तपासणी करून घरीच उपचार करणे सुरू केले. संबंधित डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय एचआरटीसी करण्यास परवानगी नाही. मात्र, कोरोनाच्या धास्तीने प्रिस्क्रीप्शनविना ही तपासणी होम क्वारंटाईन होण्याच्या घटना  वाढल्याची माहिती पुढे आली.

न्यूमोनियातील फरक समजतोकोरोना झाल्यानंतरचा न्यूमोनिया आणि अन्य न्यूमोनियामध्ये फरक असतो.   एचआरटीसी चाचणी केल्यानंतर हा फरक दिसून येतो. त्यामुळे ही चाचणी कोरोना प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. एचआरटीसी करण्यासाठी   १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. रिपोर्ट मिळायलाही विलंब होत नाही, अशी माहितीही रेडिओलॉजिस्टने दिली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या