शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या १५०० जागांसाठी तीन हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST

आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार ...

आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामाकिंत शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०२१-२०२२ या सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील १९६ शाळांमधील १५७१ जागेच्या प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. या जागेसाठी ३०८२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना शहरातील नामांकित शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.

बॉक्स

अर्ज करण्यासाठी वाढली होती मुदत

आरटीईतर्फे नामांकित शाळेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३ मार्च ते २१ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परंतु, ११ ते १५ मार्च या कालावधीत ओटीपीची तांत्रिक अडचण आल्यामुळे पालकांना अर्ज करता आला नव्हते. त्यामुळे मुदतवाढ देवून ३० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली. जिल्ह्याभरात ३०८२ जणांनी अर्ज केले.

बॉक्स

मागील वर्षी जागा रिक्त

सन २००९ पासून बालकांना मोफत प्रवेश दिल्या जात आहे. यासाठी हजारो पालक आपल्या पाल्यांचा अर्ज सादर करतात. मात्र शाळाच्या विविध अटी लादत असल्यामुळे अनेकांचा प्रवेश होत नाही. तर अनेक शाळा प्रवेश निश्चित होऊन बालकाला शाळेत प्रवेश देत नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक पदे रिक्त राहतात. परिणामी शासनाच्या मुख्य उद्देशालाचा हरताळ फासल्या जात आहे. अशा शाळांवर कारवाई करणे, गरजेचे आहे.

बॉक्स

आता लक्ष लॉटरी

३० मार्चला अर्ज करण्याची मुदत संपली. १५७१ जागांसाठी ३०८२ जणांनी अर्ज केले. एप्रिल महिन्यात लॉटरीद्वारे सोडत काढण्यात येणार आहे. तेव्हाच प्रवेश निश्चित होणार आहे. तसा संदेश पालकांना पाठविण्यात येत असतो.

कोट

तर मोठ्या शाळेचे स्वप्नही पाहू शकत नाही

शासनाच्या या योजनेतून मुलाला नामांकित शाळेत प्रवेश मिळाला तर बरे होईल. संपूर्ण कागदपत्राच्या आधारे अर्ज केला आहे. नंबर लागला नाही. तर शहरातील मोठ्या नामांकित शाळेत शिकवण्याचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.

- राजकुमार मेश्राम, चंद्रपूर

-------

शहरातील नामांकित शाळेतील शुल्क मोठ्या प्रमाणात आहे. ते भरणे कठीण आहे. आरटीई योजनेतून प्रवेश मिळाल्यास मुलाला मोठ्या व नामांकित शाळेत शिकविण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

- अमित गोंगले, चंद्रपूर