शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरातून तिघेजण नांदेड पोलिसांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 17:22 IST

गडचांदूरातील माणिकगड सिमेंट कंपनी परिसरातून चंद्रपूर पोलिसांनी तीन ट्रक चालकांना ताब्यात घेतले. हे तिघे नांदेड येथून पसार झालेले कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा संशय आहे. नांदेडचे पथक या तिघांच्या शोधात गुरुवारी चंद्रपूरात आले असता तिघांनाही त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

ठळक मुद्देतिघेही नांदेड येथून पसार झालेले कोरोनाबाधित असल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गडचांदूरातील माणिकगड सिमेंट कंपनी परिसरातून चंद्रपूर पोलिसांनी तीन ट्रक चालकांना ताब्यात घेतले. हे तिघे नांदेड येथून पसार झालेले कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा संशय आहे. नांदेडचे पथक या तिघांच्या शोधात गुरुवारी चंद्रपूरात आले असता तिघांनाही त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. या तिघांची नावे मात्र नांदेड येथून पसार झालेल्या कोरोना बाधितांशी जुळत नसल्याने नांदेडचे पथकही संभ्रमात पडले आहे. या तिघांची नांदेड येथे पोहचताच कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.प्राप्त माहितीनुसार, नांदेड येथे २० जणांची एकाचवेळी कोरोना तपासणी केली होती. हा अहवाल येण्यापूर्वीच तिघेजण पसार झाले. अहवालात सर्व २० ही जणांना कोरोनाचे निदान झाले. तेव्हापासून नांदेड पोलीस त्या शोधत आहेत. अशातच बुधवारी सकाळी कोरपना तालुक्यातील माणिकगड (गडचांदूर) सिमेंट कंपनी परिसरात तीन चालक स्नान करीत असतानाचे फोटो काढून हे तिघे नांदेड येथून पसार झालेले कोरोना बांधित असल्याचे सोशल मिडियावर व्हायरल केले. या आधारे नांदेड पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांशी संपर्क साधून या तिघांना ताब्यात घेऊन विलगीकरण केले. नांदेड पोलिसांचे पथक रुग्णवाहिकेसह आज चंद्रपूरात दाखल झाले. या पथकाच्या प्राथमिक चौकशीत नांदेड येथून पसार झालेल्या तिघांची नावाशी या तिघांशी जुळत नसल्याचे पुढे आले. तरीही खबरदारी म्हणून या तिघांनाही नांदेडला रवाना करण्यात आले. आता या तिघांची नांदेड येथेच कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.सोशल मिडियामुळे संभ्रम - पोलिसांचे ताशेरेसोशल मिडियावर नांदेड येथून पसार झालेले तीन कोरोनाबाधित चंद्रपूरात आढळल्याची चर्चा व्हायरल झाली. यामुळे जनतेमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण होईल. अशाप्रकारे संदेश किंवा माहिती खात्री झाल्याशिवाय सोशल मिडियावर प्रसारीत करु नये, यावर चंद्रपूर पोलिसांनी ताशेरे ओढले आहे.सिमेंटची वाहतुक करणाऱ्या चालकांवरच नियंत्रणच नाहीलॉकडाऊनच्या काळातच चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना सुरू करण्याचे निर्देश दिले होते. सिमेंट उद्योगही सुरू करण्यात आले. या उद्योगातून दररोज सिमेंटच्या बॅग्स ट्रकद्वारे बाहेर जिल्ह्यात नेल्या जात आहे. या माध्यमातून ट्रक चालक आणि क्नीनरचा कोरोनाग्रस्त जिल्ह्यात प्रवास होत आहे. दरम्यान ही मंडळी कोणाच्या संपर्कात येते, कुणाशी भेटते. याची कुठेही नोंद होत नाही. सिमेंट पोहचवून आल्यानंतर ही मंडळी बिनदिक्ततपणे वावरत असतात. पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिघेजण वेगवेगळ्या ठिकाणचे असून गडचांदूर येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक असल्याचे समजते. ते नांदेडसह अन्य जिल्ह्यात प्रवास करून आलेले आहेत. अशाचप्रकारे अन्य ट्रक चालकांचा प्रवास सुरू आहे.

टॅग्स :Policeपोलिस