शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

सराईत गुन्हेगारांकडून तीन लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST

चंद्रपूर : किरायाने गाडी घेऊन सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून अटक केली ...

चंद्रपूर : किरायाने गाडी घेऊन सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून अटक केली आहे. यावेळी दहा चुंगड्यांतून २०० ग्रॉम वजनाच्या ४०० पाकिटे सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील तीन जण सराईत गुन्हेगार आहेत. करण मुन्ना समूद (२२) याच्यावर विविध प्रकारचे जवळपास ४० गुन्हे दाखल आहेत, तर असिफ शेख अष्टभुजा वॉर्ड याच्यावर मॅर्डर चोरी, मोहित उर्फ गोलू मेश्राम यांच्यावर तळीपाराचा प्रस्ताव प्रलंबित असून, विविध गुन्हे दाखल आहेत. यासह अन्य तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. चारचाकी वाहनातून गडचिरोलीवरून-चंद्रपूरकडे सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून वलणी फाट्याजवळ कारवाई करून दहा चुंगड्यांमधून तीन लाख आठ हजार रुपये किमतीच्या २०० ग्रॉम वजनाच्या ४०० पाकिटे सुगंधित तंबाखू जप्त करून सहा जणांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.