शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे हातपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:31 IST

यंदा अल्प पाऊस पडल्याने पाणी टंचाईची चाहुल आतापासूनच सुरू झाली.

ठळक मुद्देपाण्यासाठी भटकंती : नगर परिषद प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा अल्प पाऊस पडल्याने पाणी टंचाईची चाहुल आतापासूनच सुरू झाली. मात्र, चंद्रपूर महानगर पालिकेसह जिल्ह्यातील नगर परिषद अंतर्गत २७७ हातपंप बंद असल्याचे वास्तव पुढे आले आहे.नगर परिषदअंतर्गत सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये बहुतेक मुख्य वॉर्डांचाच समावेश आहे. परंतु, मुख्य नळयोजनेच्या पाईपलाईनपासून दूर असणाºया वॉर्र्डांमधील नागरिक हातपंपावर अवलंबून आहेत. शासना विविध योजनामधील हातपंप खोदण्यात आले. जिल्ह्याती नगर परिषद हद्दीमधील सुमारे १००० हातपंप आहेत. या हातपंप दुरुस्ती करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी, हातपंप बंद होवूनही तीन ते चार महिने दुरुस्ती होत नसल्याचे उघडकीस आले आहे.यंदा कमी पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालावली. काही वॉर्डांमध्ये शंभर फूट हातपंप खोदूनही पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. जादा फूटांवर खोदलेल्या हातपंपाची संख्या कमीच आहे. पण, नादुरुस्त असलेल्या आणि दुरुस्तीनंतर पिण्यास योग्य असणाºया हातपंपाचीच संख्या ३०० हून अधिक भरण्याची शक्यता आहे. हातपंप खोदल्यानंतर दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद यांत्रिकी अथवा शासनाच्या अन्य प्राधिकृत यंत्रणेशी करार केला जातो. त्यासाठी नगर परिषदांना शुल्क भरावा लागतो. मात्र, पदाधिकारी व संबंधित अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे शुल्क भरण्यात आले नाही. त्यामुळे शेकडो हातपंप बंद पडले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज असणाºया वॉर्डांमध्येच हातपंप बंद असल्याने पाण्याची गरज भागविण्यासाठी अन्य वॉर्डांत भटकंती सुरू असल्याचे चित्र नगर परिषद हद्दीमध्ये दिसून येत आहे.चंद्रपुरातील २०२ हातपंप बंदचंद्रपूर मनपा हद्दीत ६५६ हातपंप खोदण्यात आले. या हातपंपामुळे विविध वॉर्डांतील नागरिकांना पाण्याची गरज भागविणे शक्य झाले होते. दरम्यान, पाण्याची पातळी खालावल्याने आणि तांत्रिक अडचणीमुळे सध्य:स्थितीत चंद्रपूर शहरात केवळ ४५४ हातपंप सुरू आहेत. उर्वरीत २०२ हातपंप बंद असल्याने नागरिकांची गोची झाली आहे. नळ योजनेद्वारे ज्या वॉर्डांत पाणी मिळते, तिथून गरजा भागविण्याची वेळ हजारो नागरिकांवर आली आहे.निधीची तरतूद करावीशहरातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक राहणाऱ्या वॉर्डांत अनेक हातपंप खोदण्यात आलेत. मात्र, दुरूस्तीसाठी निधीची तरतुद केली नाही. विविध योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करताना गोरगरीब अवलंबून असणाºया हातपंपांसाठी निधीची तरतूद का नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.