शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तीन शासकीय आयटीआयचे नाव बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 14:03 IST

चंद्रपूर -राणी दुर्गावती : पोंभुर्णा - भगवान बिरसा मुंडा : बल्लारपूर - राणी ३ हिराई असे नाव

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राणी दुर्गावती, पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान बिरसा मुंडा, तर बल्लारपूर येथील शासकीय औद्योगिक संस्थेला राणी हिराई असे नाव देण्यात आले आहे. या सर्व आयटीआयचा नामकरण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले.

यासंदर्भात, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली होती. राज्य सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शौर्याचे प्रतीक असलेल्या महान व्यक्तिमत्त्वांची नावे दिल्याने भावी पिढीला तसेच तरुणांना प्रेरणा मिळेल. त्यांना आपल्या सामाजिक जबाबदारीची कायम जाणीव राहील, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त आहे.

चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील गोंड साम्राज्याची धुरा यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या आणि अफाट शौर्याचे प्रतीक असलेल्या राणी हिराई यांचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिले आहे. राणी दुर्गावती, भगवान बिरसा मुंडा, राणी हिराई या तिनही महान व्यक्तिमत्त्वाचे नाव जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूर मुलींच्या आयटीआयमध्ये सोहळा चंद्रपूर येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे राणी दुर्गावती असे नामकरण करण्यात आले. यानिमित्त रविवारी आभासी पद्धतीने नामकरण सोहळा पार पडला. चंद्रपूर येथील मुलींच्या आयटीआयमध्ये नामकरण सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांच्यासह शिक्षक, निदेशक, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पेढा भरवून सर्वत्र आंदन व्यक्त करण्यात आला.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरiti collegeआयटीआय कॉलेज