शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तेलवासा गावात तीन दिवसांत तिघांचा मृत्यू

By admin | Updated: September 25, 2014 23:21 IST

भद्रावती तालुक्यातील साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या तेलवासा गावात मृत्यूने थैमान घातले आहे. लागोपाठ तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

भद्रावती : भद्रावती तालुक्यातील साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या तेलवासा गावात मृत्यूने थैमान घातले आहे. लागोपाठ तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. २४ सप्टेंबर बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान गावातील प्रितम गौतम नगराळे या २२ वर्षीय तरुणाचा नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. २३ सप्टेंबरला याच गावातील १५ वर्षीय विद्यार्थीनी आचल शेषराव नगराळे हिचा डेंग्युने मृत्यू झाला. तत्पूर्वी जेना येथील सागर केशव मिलमिले याचाही मृत्यू झाला. दरम्यान गावात सुमारे १५ जणांना तापाची लागण झाली आहे. प्रितम गौतम नगराळे या युवकाला चंद्रपूरवरुन उपचारासाठी नागपूरला हलविले होते. तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. अविवाहीत असलेल्या प्रितमचे हरणीयाचे आॅपरेशन झाले होते. सोबतच डेंग्यु मलेरिया, काविळ आणि शिकलसेल आजाराने तो त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. लागोपाठ दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने तेलवासा गावात शोककळा पसरली आहे. या गावालगत कोळसा खाण आहे. यामुळे प्रदूषणाने गावकरी त्रस्त आहे. तसेच वर्धा नदीवरुन आयुधनिर्माणीसाठी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकली आहे. याच पाईप लाईनमधून एक नळ गावकऱ्यांसाठी दिला आहे. या नळाद्वारे नदीतील अशुद्ध पाणी गावकऱ्यांना मिळत आहे. पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होत नाही. येथील एका सार्वजनिक बोअरवेलच्या माध्यमातूनसुद्धा पाणी रोगराईला खतपाणी घालत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. उपसरपंच अनिता बोबडे, ग्रा.पं. सदस्य मोरेश्वर जुनघरे, देवता लभाने, माजी सरपंच प्रिती कांबळे, भिमराव कांबळे, शंकर नगराळे, पवन नगराळे, शंकर कुंभरे आणि गावकऱ्यांनी सदर समस्येबाबत प्रशासनाने वेळीच उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)