शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीन म्हशींचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

By admin | Updated: May 29, 2016 01:11 IST

चंद्रपूरवरुन सकाळी १० वाजता गोंदियाकडे निघणाऱ्या रेल्वे गाडीच्या खाली केळझर-टोलेवाहीदरम्यान रेल्वे रुळ ओलडताना तीन म्हशी आल्या.

वाहतूक ठप्प : सुदैवाने हजारो प्रवासी बचावलेब्रह्मपुरी : चंद्रपूरवरुन सकाळी १० वाजता गोंदियाकडे निघणाऱ्या रेल्वे गाडीच्या खाली केळझर-टोलेवाहीदरम्यान रेल्वे रुळ ओलडताना तीन म्हशी आल्या. यात या म्हशींचा मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात रेल्वेला काहीही झाले नाही आणि प्रवासी बचावले.यापैकी एका म्हशीचे धड व तोंड रेल्वे इंजीनमध्ये विचित्र पध्दतीने फसल्यामुळे इंजिन निकामी झाले. गोंदियाकडे जाणाऱ्या गाडीचा प्रवास ठप्प झाला. अपघात एवढा विचित्र होता की तिन्ही म्हशीला तब्बल ३०० फूट गाडीने समोर ओढत नेले. त्यापैकी एका म्हशीने अपघातातच पिलाला जन्म दिला, पण त्याचाही मृत्यू झाला. या तीनपैकी दोन म्हशी रुळाबाहेर फेकल्या गेल्या. परंतु एक म्हैस मात्र रेल्वेच्या चाकात विचित्र प्रकारे फसली. तिला काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.यानंतर गोंदियाकडून चंद्रपूरकडे जाणारी रेल्वे गाडी मुल येथे पोहोचल्यानंतर तिचे इंजीन घटना स्थळावर नेण्यात आले व अपघातग्रस्त रेल्वेगाडीला मूल येथे आणण्यात आले. त्यानंतर बल्लारशावरुन इंजीन आले, तेव्हा गाडीला सरळ गोंदियाकडे नेण्यात आले.विशेष म्हणजे, या घटनेनंतर अनेक तास ही रेल्वे जागेवर थांबून राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. जवळपास मोठे स्टेशन नसल्याने त्यांना रेल्वेत बसूनच पुढच्या प्रवासाची प्रतीक्षा करावी लागली. ब्रह्मपुरीला दुपारी १ वाजता पोहचणारी रेल्वे तब्बल सायंकाळी ५ वाजता ब्रह्मपुरीला पोहोचली. सुदैवाने ३०० फूट म्हशींना ओढत नेले तरी रेल्वे रुळावरुन घसरली नाही. अन्यथा हजारो प्रवाशांचा यात घात झाला असता. (तालुका प्रतिनिधी)