शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

धास्तावलेल्या व्यापार्‍यांनी कार्बाईड फेकले उघड्यावर

By admin | Updated: May 30, 2014 23:34 IST

अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी आंबा विक्रेत्यांच्या गोदामावर टाकलेल्या धाडीनंतर आंब्याचे ठोक विक्रेते धास्तावले आहेत. कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकविलेल्या आंब्यांच्या

आंब्याच्या बाजारात शुकशुकाट : कारवाईनंतर आंब्याच्या विक्रीत घटगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरअन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी आंबा विक्रेत्यांच्या गोदामावर टाकलेल्या धाडीनंतर आंब्याचे ठोक विक्रेते धास्तावले आहेत. कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकविलेल्या आंब्यांच्या साठय़ावर पुन्हा धाड पडण्याच्या भीतीने अनेक व्यापार्‍यांनी साठविलेल्या मालाची काल रात्रीतच परस्पर विल्हेवाट लावली. एवढेच नाही तर, कॅल्शियम कार्बाईडच्या पुड्याही बाजार समितीच्या आवारातच उघड्यावर फेकून दिल्या. त्या आज शुक्रवारी दिवसभर कचर्‍याच्या ढिगात पडून होत्या.आंबे जप्त केल्याचे वृत्त आज वृत्तपत्रातून प्रकाशित होताच ग्राहकांमध्येही खळबळ माजली. त्याचा परिणाम आंब्याच्या विक्रीवर झाला. बाजार समितीमधील ठोक बाजारात आज आंबे नेण्यासाठी घाऊक व्यापार्‍यांची वाहनेच आली नाहीत. किरकोळ व्यापार्‍यांनीही अल्प खरेदी केली. आंब्याच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो याची कल्पना आल्याने ठोक व्यापार्‍यांनी मालाची ऑर्डर रद्द केली. परिणामत: आंब्याची आवक मंदावली. शुक्रवारी दुपारी एरवी गजबजलेल्या बाजार समितीच्या ठोक आंबा बाजारात शुकशुकाट जाणवला. पुन्हा धाड पडण्याच्या शक्यतेने अनेक व्यापार्‍यांनी तर दुकानेच उघडली नव्हती. काहींनी दुपारनंतर बंद केली. काही दुकाने सुरू असली तरी खरेदीदार मात्र फिरकले नाहीत.चंद्रपुरात फळांचे जवळपास १३ होलसेलर्स आहेत. आंध्रप्रदेशातील बड्या व्यापार्‍यांच्या माध्यमातून ही खरेदी होते. आंध्र प्रदेशातील जगत्याल येथून  चंद्रपुरात दिवसाला सरासरी ४0 टन आंबे येतात. त्यातून दिवसाकाठी सरासरी ६0 लाख रुपयांची उलाढाल होते. मात्र आज व्यापार्‍यांचा गल्ला रिकामा होता.