शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

बल्लारपूर तालुक्यात हजारो शौचालये बिनकामी

By admin | Updated: March 26, 2016 00:40 IST

बल्लारपूर पंचायत समितीने स्वच्छता अभियानाअंतर्गत या पंचायतीतील एकूण सर्व १७ गावांमध्ये शौचालय बांधण्याचे ठरविलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे.

उद्दिष्ट पूर्ण : तरीही स्वच्छता अभियानाचा फज्जावसंत खेडेकर  बल्लारपूरबल्लारपूर पंचायत समितीने स्वच्छता अभियानाअंतर्गत या पंचायतीतील एकूण सर्व १७ गावांमध्ये शौचालय बांधण्याचे ठरविलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे. मात्र, याच स्वच्छता अभियानाअंतर्गत सुमारे दहा वर्षांपूर्वी, याच गावांमध्ये बांधलेले शौचालय वापर नसलेल्या स्थितीत आहेत. कुटुंबानी त्यांचा वापर करणे बंद केले आहे. परिणामी अशा कुटुंबियांना आता उघड्यावर बसावे लागत आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत आहे.बल्लारपूर पंचायत समितीने, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येणाऱ्या एकूण सर्व १७ गावांचे शौचालयाबाबत सर्वेक्षण केले. पाच एकराच्या आत शेतजमीन असलेल्या एकूण १६२२ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे या सर्वेक्षणातून आढळून आले. या कुटूंबांना शौचालय बांधण्याकरिता पंचायत समितीकडून अनुदान देण्यात आले. मार्च महिना संपण्यापूर्वीच सर्वच १६२२ शौचालय बांधून पूर्ण झाले आहेत. याप्रकारे नवीन शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट या पंचायत समितीने मुदतीपूर्वीच पूर्ण केले. लोकांनी घरी बांधून असलेल्या शौचालयाचा उपयोग करावा, त्यांनी उघड्यावर बसू नये, असा संदेश विविध मार्गांनी गावकऱ्यांना पंचायत समितीकडून देणे सुरू आहे. प्रसंगी गुडमार्निंगचा फार्म्युलाही वापरला जातो आहे. गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या मनावर तसे बिंबविण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून विद्यार्थी आपल्या कुटुंबियांना शौचालयाचा वापर करण्याला आग्रहपूर्वक बाध्य करतील. त्याचा चांगला परिणामही दिसून येत असल्याचे बल्लारपूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे सारे ठिक असले तरी दुसरी एक बाजू या गावांत बघायला मिळते, ती म्हणजे नादुरुस्त असलेल्या शौचालयांची मोठी संख्या. पंचायत समिती वा ग्रामपंचायतीच्या निधीतून १० वर्षापूर्वी बांधलेले शौचालय आज मोडकळीस आले आहेत. त्यांचा वापर लोकांनी बंद केला आहे. या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अशा नादुरुस्त शौचालयांची एकूण संख्या १६०० एवढी मोठी आहे. या नादुरुस्त शौचालयांना नव्याने बांधण्याकरिता पंचायत समितीकडून निधीची तरतूद नाही. आणि स्वखर्चाने नव्याने शौचालय बांधण्याची बऱ्याच जणांची आर्थिक क्षमता नाही व आर्थिक क्षमता असली तरी तशी इच्छा नाही. एकीकडे नवीन शौचालय बांधण्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे तर दुसरीकडे तेवढ्याच संख्येत नादुरुस्त शौचालय आहेत. अशी स्थिती स्वच्छता अभियानाला मारक ठरणार आहे. शासन कुणालाही शौचालय बांधण्यासाठी एकदाच अनुदान देते, दुसऱ्यांदा नाही. अशा स्थितीत, परिसरातील मोठ्या उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून या नादुरुस्त शौचालयांच्या बांधकामाकरिता पैसे मिळविण्याच्या प्रयत्नात पंचायत समिती लागली आहे, असे समजते.