शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी केलेले हजारो शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:20 IST

हमीभावाने तुरीची विक्री करावी, याकरिता हजारोे शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली. नाफेडने संथगतीने तूर खरेदी केली. त्यातच अनेक अडचणी आल्या होत्या. आता शासनाने २० एप्रिलनंतर नाफेडने तूर खरेदी करु नये, असे कळविले.

ठळक मुद्देआता शेतकऱ्यांनी करावे काय? : नाफेडच्या तूर खरेदीची शासकीय मुदत संपली

प्रवीण खिरटकर।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : हमीभावाने तुरीची विक्री करावी, याकरिता हजारोे शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली. नाफेडने संथगतीने तूर खरेदी केली. त्यातच अनेक अडचणी आल्या होत्या. आता शासनाने २० एप्रिलनंतर नाफेडने तूर खरेदी करु नये, असे कळविले. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी करुनही हजारो शेतकरी नाफेडकडे तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.शेतकºयांचे तूर पीक निघताच बाजारातील भाव पडले. त्यामुळे शासनाने तुरीकरिता हमीभाव जाहीर केला. शासनाच्या वतीने नाफेडमार्फत शेतकºयांना तूर खरेदी केली जात होती.याकरिता शेतकºयांनी पेरीपत्र, सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुकची सांक्षाकित प्रत आदी घेवून नाफेडकडे आॅनलाईन अर्ज केले. या अर्जानुसार शेतकºयांना लघु संदेश किंवा भ्रमणध्वनीवर कॉल करुन तूर खरेदीकरिता बोलावले जात होते. नाफेडने सुरुवातीला बारदान्याची कमतरता, मोजणीकरिता पुरेसे मनुष्यबळ नसणे साहित्याची जुळवाजुळव करताना अगदी संथगतीने तूर खरेदी केली.त्यामुळे शेकडो शेतकरी लघुसंदेशाची वाट बघत असताना २० एप्रिल ही खरेदीची अंतीम तारीख आली आणि नाफेडने तूर खरेदी बंद केली. त्यामुळे शेकडो शेतकºयांनी नोंदणी करुन तुरी घरीच ठेवाव्या लागल्या आहे. तूर घरात अधिक दिवस ठेवल्यास त्याची प्रतवारी खराब होवून बाजारात कवडीमोल भावाने तूर विकाव्या लागणार असल्याचे दिसून येत आहे.आचारसंहितेचा फटका?शासनाने नाफेडला तूर खरेदीची अंतीम तारीख २० एप्रिल दिली होती. त्यामुळे तूर खरेदी परत सुरु करण्यास शासनास निर्णय घ्यावा लागेल. परंतु अजूनही राज्यात अनेक ठिकाणी मतदान होणे शिल्लक असल्याने तूर खरेदी परत सुरु करण्याकरिता आचारसंहितेची आडकाठी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गोदामे निवडणुकीने व्याप्तनाफेडकडून ज्या ठिकाणी तूर खरेदी करुन ठेवली जाते. ती बहुतांश गोदामे निवडणूक विभागाने अनेक दिवसांपूर्वी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे गोदामे शिल्लक नसल्याने काही काळ नाफेडने तूर खरेदी थांबविली असल्याचे समजते. निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणी कुणासही जाणस निर्बंध असल्याने तूर खरेदी बंद होती. २० एप्रिलपूर्वी एकाच आठवड्यात दोन सुट्ट्या आल्या. त्यामुळे त्या आठवड्यातही पाहिजे त्या प्रमाणात तूर खरेदी झाली नाही.शासनाने २० एप्रिलपर्यंत तूर खरेदी करण्याचे आदेश दिल्याने तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. तूर खरेदीबाबत अद्याप कुठलेही आदेश प्राप्त झाले नाही.- विवेक मारकवार, केंद्रप्रमुख, नाफेड