शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

धाडसत्राने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

By admin | Updated: August 1, 2016 00:36 IST

दररोज कुठे ना कुठे, अवैध दारू विक्रेत्यांवर पाळत ठेवून मुद्देमालासह अटक केली जात असल्याने ...

१० लाखांचा माल जप्त : तिघांना पोलीस कोठडीब्रह्मपुरी : दररोज कुठे ना कुठे, अवैध दारू विक्रेत्यांवर पाळत ठेवून मुद्देमालासह अटक केली जात असल्याने या धाडसत्रामुळे अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. शनिवारी झालेल्या कारवाईत आशिष विश्वनाथ धोंगडे रा. नागभीड, रवी रमय्या कुल्लूरवार रा. ब्रह्मपुरी व आशिष पांडुरंग परशुरामकर रा. पिंपळगाव (कोहली) यांना मुद्देमालासह अटक केली. तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. ३० जुलैच्या मध्यरात्री गांगलवाडी रोडवर झालेल्या कारवाईत ४० पेट्या देशीदारू महा-३४ एआर-७३६४ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनासह पकडली. यात आशिष विश्वनाथ घोंगडे व रवी रमय्या कुल्लूरवार रा. ब्रह्मपुरी यांना अटक करण्यात केली. तर त्याच रोडवर काही वेळातच दुचाकी वाहन पकडून आशिष पाडुरंग परशुरामकर रा. पिंपळगाव (कोहळी) ता. लाखांदूर याला देशी दारु नेताना रंगेहाथ पकडले आहे. या तिघांनाही ब्रह्मपुरीच्या न्यायालयात हजर केले असता १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दररोजच्या या धाडसत्राने पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर यांचा दरारा निर्माण होऊन अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र दिसून येत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक खैरकर, एपीआय खंडाळे व कर्मचाऱ्यांनी केली. (तालुका प्रतिनिधी) वाहनासह तीन लाखांची दारु जप्तवरोरा : वरोरा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने नाकेबंदी करुन आनंदवन चौकात एक वाहन अडवून तपासणी केली असता वाहनात एक लाख ६१ हजार रुपयाची विदेशी दारू आढळून आली. वाहनासह दारू जप्त करून एका व्यक्तीस अटक केली. वरोरा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकास नागपूर वरुन चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका वाहनात दारु असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे वरोरा येथील आनंदवन चौकात नाकेबंदी करुन एमएच-३२ झेड- ९५९५ या वाहनाची तपासणी केली असता, दारू आढळली. वाहनातील आकाश चौधरी यास ताब्यात घेवून अटक केली तर एक जण फरार झाला. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनिष दुबे, अशोक ढोक, मदन येरणे, घनश्याम फरकाडे, राकेश तुराणकर, निखील कौराने, सचिन साठे, श्रीकांत नागोसे आदींनी केली. (तालुका प्रतिनिधी) दुचाकी वाहनासह १९ हजाराची दारू जप्तशंकरपूर : येथील पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे दुचाकी वाहनासह १९ हजाराची दारु पकडली. भिवापूर येथून देशी दारू येथे असल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शंकरपूर-हिरापूर या रस्त्या दरम्यान नाकेबंदी केली. मध्यरात्री १२ वाजता एक दुचाकी वाहन येत असल्याने दुचाकी थांबविण्यात आली. या दुचाकी वाहनात १९ हजार २०० रुपयाच्या १९२ देशी दारूच्या निप्पा आढळल्या. दुचाकी वाहन जप्त करून आरोपी भीवापूर येथील भारतसिंग भगतसिंग जुनी (२२) याला अटक करण्यात आली. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चहांदे, पोलीस उपनिरीक्षक सोनकुसरे, हवालदार पठाण, ज्ञानबोनवार, चाफले यांनी केली..