शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टर शेती पाण्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:38 IST

आसोलामेंढा तलाव पाथरी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान तर पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. परिसरात आसोलामेंढा तलावाचा कोणत्याही प्रकारचा कालवा नाही. परंतु आसोलामेंढा तलावाच्या नावाखाली शेतकऱ्यांला पिक विमा मिळत नाहीं.

ठळक मुद्देसिंचन सुविधांचा अभाव : शेतकऱ्यांनी काय करावे?

सुनिल दहेलकर।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : आसोलामेंढा तलाव पाथरी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान तर पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. परिसरात आसोलामेंढा तलावाचा कोणत्याही प्रकारचा कालवा नाही. परंतु आसोलामेंढा तलावाच्या नावाखाली शेतकऱ्यांला पिक विमा मिळत नाहीं. या परिसरात हजारो हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आहे. सद्यस्थितीत धान पिकांना पाणी मिळत नसल्याने धान शेती पाण्यापासून वंचित आहे.तालुक्यातील पेंढरी परिसरात हजारो हेक्टर शेतीवर धान पिकाची लागवड केली आहे. या परिसरात सायमारा, मेंढा, मुण्डाला, पेंढरी, मरेगाव, चक मनकापूर, भारपायली, चारगाव, पणधारसराड, हिरापूर इत्यादी गावे येतात. समाजाचा विकास आणि देशाची आर्थिक भरभराट शेतीवर आहे. ग्रामीण भागात ८० टक्के कुटुंबातील सदस्याचे पोट शेतीवर अवलंबून आहे. तालुक्यात बोड्या, तलावासारखे पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु पाणी साठवणूक करण्याचे तंत्र आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाला करता आले नाही. जलस्रोत वाढले नाही. याकरिता शासनाला आणखी जोर लावणे गरजेचे झाले आहे. आसोलामेंढा तलावाचा पेंढरी परिसरातील शेतकऱ्याला पाण्याचा लाभ मिळत नाही. यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असेल ?सिंचन क्षेत्रात शिस्त आणण्याची शासन एकीकडे घोषणा करते. सिंचन क्षेत्राचा अनुशेष भरून काढण्यासाठी विधानमंडळात आवाज उठविला जातो. पंरतु सिंचनाच्या सुविधा पाहिजे त्या प्रमाणात अजूनही मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. जलयुत शिवाराची चर्चा राज्यभर खूप झाली. जलयुक्त शिवार हा दुष्काळमुक्तीचा संकल्प पेंढरी परिसरात कूचकामी ठरतोय. परिसरात पाणी टंचाई असल्याने धान पीक ओंबीवर येत असताना जमिनीत ओलावा नाही. शेतीला भेगा जात आहेत. त्सिंचनाच्या सुविधांची कमतरता आहे. त्यावर उपाययोजना होताना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. परिणामी शेतकरी चिंतेत आहे. आसोलामेंढातील पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी सरपंच बंडू मेश्राम, दामोदर गोबाडे, शेतकरी दशरथ शेडमाके, नामदेव कस्तुरे आदींनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती