शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शेतकरी कामाच्या शोधात

By admin | Updated: November 20, 2014 22:49 IST

निसर्गाच्या दरवर्षीच्या वक्रदृष्टीमुळे दुबार तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरत नसल्याने पहाडावरील शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही तो कसा करावा, या विवंचनेत तो अडकला आहे.

तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती : प्रशासनाचे दुर्लक्षशंकर चव्हाण - जिवती निसर्गाच्या दरवर्षीच्या वक्रदृष्टीमुळे दुबार तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरत नसल्याने पहाडावरील शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही तो कसा करावा, या विवंचनेत तो अडकला आहे. दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आता अस्मानी संकटात सापडला आहे. पोटाच्या भ्रांतीसाठी शाळकरी मुलांना सोबत घेऊन कोणी ऊस तोड कामगार म्हणून तर कोणी कापूस वेचणीसाठी स्थलांतरित होत असल्याचे चित्र पहाडावर बघायला मिळत आहे.आंध्र-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वारंवार बसत असल्याने हंगाम संपण्यापूर्वीच पिकाची पानगळ होऊन उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. यात त्यांचा कणाच मोडला जात असून कर्जाची परतपेडही होत नाही. ही त्यांची करूण कहाणी आहे. देशात शेतकऱ्याला बळीराजा म्हणून ओळखले जाते. मात्र हा बळीराजा नावालाच राजा राहिला आहे. दुबार, तिबार पेरणी करूनही पिकत नाही. पिकले तरी विकत नाही. निवडणुका आल्या की आश्वासनाचा पिटारा खोलणारे राजकीय मंडळी आम्हीच त्यांचे कैवारी असल्याचा दावा करतात व निवडणुका संपल्या की त्यांच्याकडे पाठ फिरवितात. हा काही नवखा अनुभव नाही. एकीकडे शासन स्तरावरून मागेल त्याला काम, असा रोजगार हमी योजनेचा डंका पिटवीत असले तरी पहाडावरील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी अजूनही सर्वकंश अशी योजना किंवा उपाययोजना सरकारला तयार करता आली नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.