शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने गतवर्षी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकरी अजूनही वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरू होणाऱ्या हंगामात कर्ज घेण्यासाठी या शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने आॅक्टोबर २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून कर्जमाफी द्यायला ...

ठळक मुद्देआर्थिक विवंचना : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने गतवर्षी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकरी अजूनही वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरू होणाऱ्या हंगामात कर्ज घेण्यासाठी या शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने आॅक्टोबर २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून कर्जमाफी द्यायला सुरूवात केली. प्रारंभी महिनाभरात कर्जमाफी होईल, असे सांगितले गेले. त्यानंतर तारखा वाढत गेल्या. पण, आज सात महिन्यांचा काळ लोटला तरी संपूर्ण शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांची बँक समजल्या जाणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे ३० हजार शेतकरी सदस्यांना अजूनही कर्जमाफी मिळालेली नाही. या बँकेने जिल्ह्यातील एक लाख ११ हजार शेतकºयांचे प्रस्ताव कर्जमाफीसाठी सादर झाले. त्यापैकी ८० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली.यासाठी २७२ कोटी रूपये शासनाने दिले. मात्र, उर्वरित ३० हजार शेतकऱ्यांचे पैसे अजूनही पाठवलेले नाहीत. याची रक्कम १७५ कोटी एवढी आहे. आता हंगाम जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे शेतकºयांना आतपासूनच पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. मात्र, ज्यांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही, अशा शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.यावर्षी शासनाने जिल्हा बँकेला ५१२ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. पण, ते घेण्यासाठी शेतकरीच पात्र ठरणार नाही, अशी स्थिती आहे. जोपर्यंत कर्जमाफीचे लाभार्थी कर्जमुक्त होणार नाही, तोपर्यंत हे उद्दिष्ट गाठणे कठीण आहे. जिल्हा बँक सातत्याने शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पाठपुरावा करीत आहे. मात्र, सहकार खात्याकडून ग्रीन लिस्ट आलेली नाही.शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी उशीर होणार की मुद्दाम उशिर केला जात आहे की तांत्रिक अडचणीमुळे प्रकार घडत आहे, हे समजायला मार्ग नाही. सरकारकडे पैसे नसल्याने या प्रस्तावांना मुद्दाम थांबवण्याचे काम केले जात असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. शासनाच्या या दिरंगाईमुळे अनेकांना यावर्षीच्या खरिप पीक कर्जापासून मुकावे लागणार आहे.