शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वढा यात्रेला हजारो भाविक करणार स्नान

By admin | Updated: November 14, 2016 00:57 IST

वढा हे गाव लहान पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी वर्धा-पैनगंगा आणि उत्तरवाहिनी या नद्यांचा संगम आहे.

घुग्घुस : वढा हे गाव लहान पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी वर्धा-पैनगंगा आणि उत्तरवाहिनी या नद्यांचा संगम आहे. याठिकाणी दर कार्तिक पोर्णिमेनिमिला यात्रा भरत असते. यावेळी या नदीवर अनेक भक्तजन स्नान करण्यासाठी दुरवरून येत असतात. त्यामुळेच सोमवारला वढा येथे पहाटेपासूनच हजारो भाविक हजेरी लावणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने यात्रा बसेस सुरु केल्या आहेत.दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वढा ग्रामपंचायतने यात्रेकरूना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नदीचा प्रवाह गावाच्या बाजूला असल्याने यात्रेत व्यवसायिक दुकानदारांना आपली दुकाने नदीच्या वरच्या भागात थाटावी लागणार आहे. नदीत हजारो महिला, पुरुष, आबालवृद्ध स्नानाकरीता हजेरी लावणार आहेत. त्यादृष्टीने सुरक्षीतेसाठी उपाययोजना करण्यात आली आहे. भाविकांना बाहेर गावावरून येणा- जाण्या करीता चंद्रपूर आगरातून आठ बसेस दिवसभर ये-जा करण्याची तथा भद्रावती, वरोरा मागार्ने याञेकरूकरीता पडोली वरून बसची भोयेगांव मार्गे व घुग्घुस -वढा दिवसभर एका बसची व्यवस्था करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्याचे ४० व बाहेरून ६५ अधिकारी, पोलिस कर्मचारी असा शंभर कर्मचाऱ्याचे पथक तैनात करण्यात येणार आहे. त्यामध्ये महिला अधिकारी, पोलीस कर्मचारी राहणार आहे. वाहनाची वाहतूकी सुरळीत ठेवण्याकरीता वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांची पांढरकवडा व वढा दरम्यान तैनाती करण्यात येणार आहे. नदीच्या काठावरील विठठल रखुमाई मंदिर तर दुसऱ्या काठावरील प्राचीन हेमाडपंती शिव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. (वार्ताहर)