शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र गायमुखचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

By admin | Updated: January 15, 2017 00:46 IST

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गायमुख येथे मकरसंक्रांतीनिमित्त परंपरेने चालत आलेल्या यात्रेत हजारो भाविकांनी सहभाग दर्शवून श्रीक्षेत्र गायमुखचे दर्शन घेतले.

पारंपारिक यात्रा : मकरसंक्रांतीनिमित्त उसळली गर्दीनागभीड/तळोधी(बा) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गायमुख येथे मकरसंक्रांतीनिमित्त परंपरेने चालत आलेल्या यात्रेत हजारो भाविकांनी सहभाग दर्शवून श्रीक्षेत्र गायमुखचे दर्शन घेतले. संबंध पंचक्रोशीतील भाविक या यात्रेत सहभागी झाले होते.एका छोट्याशा डोंगरीतून अगदी अनादी काळापासून एक पाण्याचा झरा अव्याहत वाहत असून झऱ्याच्या विसर्जन स्थळी गायीचे मुख आहे. म्हणूनच या स्थळाला गायमुख हे नाव पडले असावे. अगदी कडक उन्हाळ्यातही हा झरा अविरत वाहतच असतो. याच ठिकाणी पश्चिम मुखी मारुतीचे मंदीर असून जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणाची ओळख आहे. अगदी अलिकडेच या ठिकाणी दुर्गामातेच्या मंदिराचीही उभारणी करण्यात आली आहे.जागृत स्थळ म्हणून संबंध वर्षभर भाविक या ठिकाणी जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून येत असतात. तरी पण या ठिकाणी शनिवारी विशेष गर्दी राहते. मात्र मकर संक्रांतीला या ठिकाणी परंपरेने यात्रा भरत आली आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांचे विशेष आकर्षण म्हणजे गाईच्या मुखातून येणारे पाणी अगदी श्रद्धेने प्राशन करणे. या पाण्याचे योग्य नियोजनही करण्यात आले असून दोन टाक्यामध्ये हे पाणी सोडण्यात येते. यातील एका टाक्यात महिलांची व दुसऱ्या टाक्यात पुरुषांसाठी आंघोळीची व्यवस्था करण्यात आली आहे.संपूर्ण जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही या स्थळाची ख्याती असली तरी या स्थळाचे व्यवस्थापन करण्यासाठी अद्यापही ट्रस्टची निर्मिती करण्यात आली नाही. बाळापूर येथील मोखारे परिवाराकडे या स्थळाची मालकी असल्याची माहिती आहे. त्यामुळेच की काय एव्हढ्या मोठ्या स्थळाची म्हणावी तेवढी प्रगती अद्यापही झाली नाही. मकरसंक्रांतीच्या दिवशी लोकमत चमूने या स्थळाला भेट दिली असता हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आले. अनेकांनी या ठिकाणी स्वयंपाक आणले होते. अनेक संस्था व दानशूर व्यक्तींनी महाप्रसादाचे आयोजनही केले होते. अगदी तन्मयतेने यात्रेत सहभागी झालेले भाविक गोमुखातून येणारे पारी प्राशन करून मारुतीचे व दुर्गामातेचे दर्शन घेत होते.